शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध होणार की चुरस वाढणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 12:22 IST

सर्व पक्षांची मोट बांधून उमेदवार निवडून आणण्यात सुरेशदादांचा जणू हातखंडाच राहिला. ही प्रथा त्यांचे चिरंजीव व बँकेचे विद्यमान अध्यक्ष नितीन पाटील यांना चालू ठेवण्यात कितपत यश मिळते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

ठळक मुद्देसुरेशदादा पाटील अनेक जागा बिनविरोध निवडून आणण्यात यशस्वी होत असत. त्यांच्या कार्यकाळात भाजप, शिवसेना, काँग्रेस- राष्ट्रवादी असे पक्ष त्यांच्या पाठीशी शक्ती एकवटत असत.

- स. सो. खंडाळकरऔरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सुरेशदादा पाटील यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक. ती कशी होते याबद्दल जिल्ह्यात प्रचंड औत्सुक्य निर्माण झाले आहे.

सर्व पक्षांची मोट बांधून उमेदवार निवडून आणण्यात सुरेशदादांचा जणू हातखंडाच राहिला. ही प्रथा त्यांचे चिरंजीव व बँकेचे विद्यमान अध्यक्ष नितीन पाटील यांना चालू ठेवण्यात कितपत यश मिळते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. अर्थात हे मोठे आव्हान आहे. सुरेशदादांची गोष्ट वेगळी होती. त्यांचे वय आणि बँकेच्या कामाचा प्रदीर्घ अनुभव याबद्दल एक आदरभाव होता. काटकसरीचे नियोजन करून बँकेला नफ्यात आणण्याची किमया त्यांना साधली होती. ''पारदर्शी'' अशी त्यांची प्रतिमा बनली होती.

या पार्श्वभूमीवर होऊ घातलेल्या निवडणुकीत काय चित्र निर्माण होते, याबद्दल उत्सुकता आहे. सुरेशदादा पाटील अनेक जागा बिनविरोध निवडून आणण्यात यशस्वी होत असत. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात भाजप, शिवसेना, काँग्रेस- राष्ट्रवादी असे पक्ष त्यांच्या पाठीशी शक्ती एकवटत असत.एकूण २० संचालकांसाठी ही निवडणूक होणार आहे. राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे पाटील, महसूल खात्यासह विविध खात्यांचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार व विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे यांच्यासारखे दिग्गज बँकेचे विद्यमान संचालक आहेत. या निवडणुकीत या तिघांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

नितीन पाटील हे आता भाजपमध्ये आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, माझे वडील सुरेशदादा यांच्या निधनानंतर संचालक मंडळाने माझ्यावर विश्वास टाकून मला अध्यक्ष बनविले. वर्षभर मी धुरा सांभाळली व मुदत संपल्यानंतर तेव्हाच निवडणूकही होऊन गेली असती. परंतु, कोरोना महामारी सुरू झाली आणि सतत तीनवेळा मुदतवाढ मिळत गेली. या काळात अध्यक्ष म्हणून मी सर्वांना सोबत घेऊन काम केले आहे व बँक नफ्यात कशी राहील, हे पाहिले आहे. यावेळी बँकेला चांगला नफा झालेला बघावयास मिळेल.

मी माझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणार आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न राहील. प्राथमिक पातळीवर मी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी बोलतोय. हळूहळू चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास नितीन पाटील यांनी व्यक्त केला. विद्यमान संचालकांपैकी काही जणांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. उलट भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असे दोन पॅनेल तरी दिसतील व निवडणूक चुरशीचीच होईल.

 

टॅग्स :bankबँकAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक