शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
4
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
5
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
6
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
7
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
8
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
9
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
10
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
11
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
12
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
13
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
14
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
15
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
16
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
17
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
18
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
19
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?

वन्यप्राण्यांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 23:49 IST

पाणवठे कोरडेठाक; डोंगरही बोडखे : उन्हाच्या झळांशी सामना करताना वन विभागाची दमछाक

श्यामकुमार पुरेसिल्लोड : सिल्लोड तालुक्यासह अजिंठ्याच्या डोंगरात पाण्याअभावी वन्यप्राण्यांची भटकंती सुरू आहे. उन्हामुळे डोंगर बोडखे झाले असून चोहीकडे पाण्याचा ठणठणाट आहे. वन्यप्राण्यांना थांबण्यासाठी सावली नाही. डोंगरात पिण्यासाठी पाणी नाही. उन्हाच्या झळांशी सामना करताना वन विभागाच्या नाकात दम आला आहे.मागील आठवड्यात शिरसाळा तांडा परिसरात एका बिबट्याचा अन्न -पाण्याविना तडफडून मृत्यू झाला होता. यानंतर हा प्रश्न ऐरणीवर आला. पाण्यासाठी वन्यप्राणी रस्त्यावर, गाव वस्तीकडे धाव घेताना दिसत आहेत. कृत्रिम पाणवठ्यात पाणी टाकून वन विभाग वन्यप्राण्यांची तहान भागविण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहे, पण याचा कायमस्वरूपी बंदोबस्त झाला नाही तर वन्यप्राण्यांची संख्या घटल्यास आश्चर्य वाटू नये.अजिंठा डोंगरात बिबट्या, अस्वल, हरण, मोर, लांडगा, नीलगाय, तडस, पशू पक्षी, सरपटणारे प्राणी आहेत. सिल्लोड, अजिंठा, सोयगाव वन परिक्षेत्रातील सर्वच जंगलात उन्हामुळे पानगळ झाली आहे. याचा फटका वन्यप्राण्यांना बसला आहे.सिल्लोड वन परिक्षेत्रात १ हजार ५९ हेक्टर, अजिंठा वनपरिक्षेत्रात ९ हजार हेक्टर, सोयगाव ९ हजार हेक्टर असे एकूण १९ हजार हेक्टर परिक्षेत्र आहे. त्यातील सर्वच पाण्याचे स्त्रोत आटले आहे. मानवी वस्त्यांकडे आलेल्या अनेक ठिकाणी कुत्र्यांनी हरणांचे लचके तोडले आहे. नीलगाय, हरण विहिरीत पडत आहे.३४ कृत्रिम पाणवठ्यात टँकरचे पाणीवन्यप्राण्यांची भटकंती होऊ नये, यासाठी वन विभागाने सिल्लोड परिक्षेत्रात पिंपळगाव घाट, चिंचवण, शिंदेफळ, धावडा, पळशी परिसरात ५ पाणवठे तयार केले आहेत. अजिंठा वन विभागाने अजिंठा, नाटवी, जळकी, वसई, जामठी, हिंगणा, फर्दापूर, ठाणा, देव्हारीच्या जंगलात २० कृत्रिम पाणवठे तर सोयगाव तालुक्यात ९ पाणवठे तयार केले आहेत. त्यात आता टँकरद्वारे पाणी टाकून वन्य प्राण्यांची तहान भागविण्याचा केविलवाणा प्रयत्न वन विभाग करताना दिसत आहे. अजिंठा, सिल्लोड, सोयगाव परिक्षेत्रात एकूण ३४ कृत्रिम पाणवठे तयार केले असून यात टँकरने नियमित पाणी टाकले जात आहे. यामुळे प्राण्यांची तहान काही अंशी भागत आहे, अशी माहिती अजिंठा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी एस.पी. मांगधरे, सिल्लोडचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. आर. दहिवाल, सोयगावचे शिवाजी काळे यांनी दिली. यासाठी दरमहा १ लाख ६३ हजार रुपये पाण्यावर खर्च होत आहे.४ लाख १४ हजार रोपे जगविलीअजिंठ्यात भीषण पाणीटंचाई असताना नर्सरीसाठी पाटबंधारे विभागाची परवानगी घेऊन अजिंठा मध्यम प्रकल्पातून पाणी उपसा करून अजिंठा वन विभागाने ४ लाख १४ हजार रोपे जगविली. यामुळे आज ही रोपवाटिका हिरवीगार दिसत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एस.पी. मांगधरे यांनी दिली.

टॅग्स :forest departmentवनविभागwater shortageपाणीकपात