शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा गळा आवळून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 01:08 IST

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने अंगावरील साडीनेच तिचा गळा आवळून खून केल्याची घटना वैजापूर तालुक्यातील चिकटगाव येथे शनिवारी रात्री ११ वाजता घडली. अनिता आबासाहेब मगर असे मयत विवाहितेचे नाव आहे.

शिऊर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने अंगावरील साडीनेच तिचा गळा आवळून खून केल्याची घटना वैजापूर तालुक्यातील चिकटगाव येथे शनिवारी रात्री ११ वाजता घडली. अनिता आबासाहेब मगर असे मयत विवाहितेचे नाव आहे.या घटनेविषयी मयत अनिताचे वडील सुदाम पुंडलिक गोरे (रा. दसकुली) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अनिताचा विवाह चिकटगाव येथील बहिणीच्या मुलगा आबासाहेब कचरू मगर याच्याशी गेल्या १८ वर्षांपूर्वी रितीरिवाजाने करण्यात आला. लग्नानंतर पती तिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेऊन व मारहाण करीत होता. अनिताला प्रसुतीसाठी दसकुली येथे आणले होते. त्यानंतर तिला मुलगी झाली. जावई सतत मारहाण करीत असल्याने अनिताला तीन वर्षे माहेरीच ठेवले होते. परंतु नातेवाईकांनी मध्यस्ती करून अनिताला सासरी पाठविले. त्यानंतरही पती आबासाहेब तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन नेहमी मारहाण करीत होता. परंतु आबासाहेब हा माझा भाचा असल्याने मी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली नव्हती. आज ना उद्या तो सुधरेल, या आशेवर अनिता आपला संसाराचा गाडा हाकत होती. परंतु १२ रोजी रात्री या नराधमाने अनिताला मारहाण केली व तिच्याच साडीने गळफास देऊन तिला यमसदनी पाठविले.या फिर्यादीवरून शिऊर पोलीस ठाण्यात आबासाहेब कचरू मगर याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन आरोपीस रविवारी शिर्डी येथून अटक करण्यात आली. पुढील तपास पो.नि. धनंजय फराटे हे करीत आहेत.

टॅग्स :Policeपोलिस