शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

पेट्रोलपंपावर मोबाइलवर बोलून, स्वत:सोबतच इतरांचाही जीव धोक्यात का घालतोय दादा ?

By प्रशांत तेलवाडकर | Updated: January 4, 2024 19:55 IST

पेट्रोलपंपावर मोबाइलवर बोलणे हे धोकादायक आहे, हे माहीत असतानाही मोबाइलवर बोलताना तरुण.

छत्रपती संभाजीनगर : ‘पेट्रोलपंपावर मोबाइलवर बोलण्याचा अट्टाहास नडला, बाइक पेटली’, ‘बाइकमध्ये पेट्रोल भरताना बायकोचा फोन आला अन् टाकीने पेट घेतला!’ अशा मथळ्याच्या बातम्या आपण अधूनमधून वर्तमानपत्रात वाचत असतो. पंपावर मोबाइलवर बोलणे घातक आहे, हे माहीत असतानाही अनेक बाइकस्वार त्याकडे दुर्लक्ष करतात. मोबाइलवर बोलू नये, असे स्टिकर पंपावर लावलेले असते. मात्र, त्या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. शहरातील पेट्रोलपंपावर फेरफटका मारला असता पंपासमोर सर्रास मोबाइलवर बोलणारे दिसून आले. त्यांना कोणी हटकतही नव्हते, हे विशेष. 

पंपाच्या परिसरात मोबाइलवर का बोलू नये ? १) पेट्रोलपंप परिसरात मोबाइलवर बोलणे टाळावे. २) मोबाइलमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे आग लागण्याची शक्यता असते. ३) प्लास्टिक, काचेच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल घेऊन जाणे धोकादायक असते. 

पेट्रोलपंपचालक काय म्हणतात ? १) पंपावर मोबाइलवर बोलू नये, असे स्टिकर लावण्यात आले आहे. तरी वाहनधारक त्या सूचनेकडे दुर्लक्ष करतात. २) कर्मचाऱ्यांनी वाहनधारकाला मोबाइलवर बोलण्यास मज्जाव केला तर वाहनधारक हमरीतुमरीवर येतात.३) ऑनलाइन पेमेंटसाठी क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी वाहनधारकांना खिशातून मोबाइल काढावा लागतो.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPetrol Pumpपेट्रोल पंपMobileमोबाइल