शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

औरंगजेबाची कबर येथे कशाला? संजय शिरसाट यांनी देखील केली हटविण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 18:26 IST

छत्रपती संभाजीराजेंना त्रास देणाऱ्यांची कबर येथे कशाला पाहिजे, ही कबर उखडून फेकायला हवी, मंत्री संजय शिरसाट यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर : औरंगजेबची कबर काढण्यासाठी दम लागतो, असे संजय राऊत म्हणाले, यावर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी खरमरीत टीका केली आहे. शिरसाट म्हणाले की, कुणाचा दम काढता? अडीच वर्ष तुम्ही गोट्या खेळत होता का? पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरणारे तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवता का? असा सवाल मंत्री शिरसाट यांनी केला. तसेच आमच्या छत्रपती संभाजीराजेंना त्रास देणाऱ्यांची कबर येथे कशाला पाहिजे, ही कबर उखडून फेकायला हवी, अशी आमची स्पष्ट भूमिका असल्याचे मंत्री शिरसाट यांनी सांगितले.

छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून देशभरात पुन्हा एकदा औरंगजबेबद्दल तीव्र भावना प्रकट होत आहेत. यातूनच अनेक राजकीय नेते, संस्था, संघटना यांनी छत्रपती संभाजीनगर जवळील खुलताबाद येथील औरंगजेबची कबर नष्ट करण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांनी पत्रकार परिषद घेऊन औरंगजेबाची कबर गुलामगिरीची, लाचारीची आणि अत्याचारांची आठवण करून देणारी आहे. महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर ही कबर काढावी. अन्यथा स्वाभिमानी हिंदू समाज रस्त्यावर उतरत आंदोलन करेल, मोर्चे काढेल आणि आवश्यकता भासल्यास चक्का जाम करून कारसेवा करून ती कबर उध्वस्त करेल. असा इशारा बंजरंग दलाने राज्यशासनाला दिला आहे.

नफरतची निशाणी हटवायात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची देखील भर पडली आहे. छत्रपती संभाजीनगर जवळच्या खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आहे. ही कबर उद्ध्वस्त करण्याची मागणी आता जोर धरत आहे. याबाबत विचारले असता संजय शिरसाट म्हणाले की, आमच्या पक्षाची भूमिका हीच आहे की, आमच्या छत्रपती संभाजीराजेंना त्रास देणाऱ्या औरंगजेबची कबर येथे कशासाठी पाहिजे? तो त्रास आम्हाला कशाला पाहिजे. एक राजा तिकडून येतो, इथल्या हिंदूंचे मंदिरं पाडतो, महिला भगिनींवर अत्याचार करतो, अनेक लोकांना छळतो, छत्रपती संभाजी महाराजांना चाळीस दिवस हालहाल करून मारतो, त्याची आठवण आम्हाला कशाला पाहिजे? औरंगजेबची कबर काढून फेकून द्या, नफरतची निशाणी हटवा, असे त्यांनी म्हटले आहे.

मिलिंद एकबोटे आणि समर्थकांना छत्रपती संभाजीनगर जिल्हा बंदीछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेब कबर नष्ट करण्याचा इशारा माजी आमदार तथा धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे यांनी दिला आहे. याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली असून माजी आमदार एकबोटे आणि त्यांच्या समर्थकांना १६ मार्च २०२५ ते ५ एप्रिल २०२५ पर्यंत जिल्हाबंदी करण्यात आली आहे. 

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर