शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जो येईल त्याला लस देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:02 IST

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा तिसरा टप्पा मार्चच्या पहिल्या अथवा दुसर्या आठवड्यात सुरु होणार आहे. या टप्प्यात ५० वर्षांवरील ...

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा तिसरा टप्पा मार्चच्या पहिल्या अथवा दुसर्या आठवड्यात सुरु होणार आहे. या टप्प्यात ५० वर्षांवरील नागरिकांना डोस देण्यात येणार आहे. मात्र, यासाठी अद्यापही नोंदणीची प्रक्रिया सुरु झालेली नाही. या तिसर्या टप्प्यात यावेळी नोंदणीऐवजी जो येईल त्याला लस, अशी पद्धत राबविण्याच्या हालचाली सुरू आहेत. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्यांना आणि दुसर्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण सध्या जिल्ह्यात सुरू आहे. यात ३३ हजार आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यात येत आहे. या दोन्ही टप्प्यातील लसीकरणासाठी लसीच्या लाभार्थ्यांची नावे को-विन अ‍ॅपवर अपलोड करावी लागली. ऑनलाइन पद्धतीनेच लसीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. यामध्ये बर्याच अडचणी येत आहे. लसीकरणाचा संदेश लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची स्थिती आहे. अ‍ॅप संथगतीने चालत असल्याने लसीकरणाची प्रक्रियाही संथ होते. लसीकरणाच्या पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातील लाभार्थ्यांची संख्या मर्यादित आहे. तिसर्या टप्प्यात मात्र ५० वर्षांवरील लोकांना लस देण्यात येणार आहे. त्यांची संख्याही अधिक राहणार आहे. परंतु अद्यापपर्यंत त्यासाठी कोणतीही नोंदणी प्रक्रिया सुरु झालेली नाही. तिसर्या टप्प्यात लसीकरणासाठी जागेवरच नोंदणी करून डोस देण्याचा विचार आरोग्य यंत्रणेकडून सुरु आहे. त्यावर लवकरच शिक्कमोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लसीकरणाचे केंद्र वाढणार

लसीकरणाचे केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी म्हणाले. लसीकरणाचा तिसरा टप्पा ६ मार्चनंतर सुरु होईल. यात ५० वर्षांवरील लोकांना लस देण्यात येणार आहे. तोपर्यंत लस साठविण्याची क्षमतेतही वाढ होईल, असे आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे म्हणाले.