शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अधिसभा, विद्या परिषद अन् अभ्यास मंडळाचा तख्त कुणाला मिळणार? मतमोजणीस सुरुवात

By संतोष हिरेमठ | Updated: December 13, 2022 12:47 IST

२१३ उमेदवारांचा आज फैसला, मतमोजणी सुरू

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे. 

क्रीडा विभागातील बॅडमिंटन हॉलमध्ये  मतमोजणी होत आहे. मतमोजणीसाठी तीन सत्रांत मिळून ७० शिक्षक, १४० अधिकारी-कर्मचारी तसेच ३० वर्ग चार कर्मचारी अशी २४० जणांची नियुक्ती केली आहे. अधिष्ठाता, उपकुलसचिव यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अधिसभेच्या विद्यापीठ शिक्षकांच्या ३ जागांसाठी ९ उमेदवार आणि १२८ मतदार, संस्था चालकांच्या ४ जागांसाठी ८ उमेदवार आणि १६९ मतदार, प्राचार्यांच्या ८ जागांसाठी १४ उमेदवार आणि ७८ मतदार, महाविद्यालयीन शिक्षकांच्या १० जागांसाठी ३९ उमेदवार आणि २ हजार ५८७ तर विद्या परिषदेच्या ६ जागांसाठी १९ उमेदवार आणि १ हजार २४३ मतदार होते. विद्या परिषद या प्रवर्गासाठी विद्यापीठ शिक्षक तसेच महाविद्यालयीन शिक्षक असे दोन्ही मतदार होते.कमी वेळेत मतमोजणी होऊन निवड प्रमाणपत्र तत्काळ वितरणाची व्यवस्था केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी, कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी दिली.

या निवडणुकीत अधिसभेच्या २५ व विद्यापरिषदेच्या सहा जागांसाठी प्रत्यक्ष मतदान झाले. दोन्ही गटात मिळून तीन जागा बिनविरोध आल्या असून तीन जागा रिक्त राहिल्या आहेत. या निवडणुकीत प्रवर्गनिहाय निवडणूक झालेल्या जागा, उमेदवार व मतदारांची संख्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे :-अधिसभा : विद्यापीठ शिक्षक - ३ जागा, ९ उमेदवार, १२८ मतदारसंस्थाचालक : ४ जागा, ८ उमेदवार, १६९ मतदारप्राचार्य : ८ जागा, १४ उमेदवार, ७८ मतदारमहाविद्यालयीन शिक्षक : १० जागा, ३९ उमेदवार, २ हजार ५८७तर विद्यापरिषदेच्या - ६ जागांसाठी १९ उमेदवार तर १ हजार २४३ मतदार  होते. विद्या परिषद या प्रवर्गासाठी विद्यापीठ शिक्षक तसेच महाविदृयालयीन शिक्षक असे दोन्ही मतदार होते. निवडणूक विभागाचे उपकुलसचिव डॉ.विष्णु क-हाळे, अर्जुन खांड्रे, संजय लांब यांच्यासह विविध समित्यांचे सदस्य अधिकारी, कर्मचारी प्रयत्नशील आहेत.

तीन जण बिनविरोधअधिसभेच्या तीन जागांसाठी प्रत्येकी एकच उमेदवार वैध ठरल्यामुळे या जागा बिनविरोध आल्या आहेत. यामध्ये संस्थाचालक महिला गटातून अर्चना बाळासाहेब चव्हाण (अर्चना रमेश आडसकर), व नितीन उत्तमराव जाधव (अनूसूचित जमाती प्रवर्ग) तसेच (अनूसूचित जमाती प्राचार्य प्रवर्गातून) डॉ.शिवदास झुलाल शिरसाठ हे बिनविरोध निडणून आले आहेत.

१३ अभ्यास मंडळे बिनविरोध दुस-या टप्प्यात ४ विद्याशाखेतील ३८ अभ्यासमंडळासाठी निवडणूक झाली. यामध्ये मानव्यविद्या (१३), विज्ञान व तंत्रज्ञान (१३), वाणिज्य व व्यवस्थापन (पाच) तर आंतरविद्याशाखेतील (सात) अभ्यासमंडळाचा समावेश आहे. यातील ऊर्दू, मानसशास्त्र, मत्स्यशास्त्र, गणित, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरींग, प्राणीशास्त्र, एमबीए, बी.पी.एड, शैक्षणिक प्रशासन, शैक्षणिक तत्वज्ञान, शारीरिक शिक्षण शिक्षक या १३ अभ्यासमंडळाची निवडणुक बिनविरोध झाली. तर सबस्टेंटिव्ह लॉ, प्रोसिजर लॉ, इलेक्ट्रॉनिक्स - टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग, सिव्हील इंजिनिअरिंग व एमसीए या सहा अभ्यासमंडळात एकही पात्र उमेदवार मिळाला नाही. उर्वरित एकूण १९ अभ्यासमंडळाच्या प्रत्येकी ३ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान झाले. यासाठी १२४ उमेदवार तर १ हजार २४३ मतदार होते. या सर्व अभ्यासमंडळाची मतमोजणीही मंगळवारी सकाळी सुरू झाली. या निकालासोबतच बिनविरोध आलेल्या सदस्यांचेही प्रमाणपत्र मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी दिली.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र