शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोणता मच्छर चावला, हे आता ओळखता येणार; प्राध्यापिकेचे मॉड्यूल, पेटंटसाठी प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 07:30 IST

या संशोधनाचे पेटंट प्रकाशित झाले असून, कन्फर्मेशन प्रक्रिया सुरू आहे. 

- राम शिनगारे छत्रपती संभाजीनगर : ‘रोबोट’ सिनेमात नायिकेस चावलेला नेमका डास यंत्रमानव ‘चिट्टी’ (रजनीकांत) पकडून आणतो. काहीसे तसेच तंत्रज्ञान आता विकसित होत आहे. मच्छरजन्य रोगांपासून जगभरात दरवर्षी ७ लाखांपेक्षा अधिक मृत्यू होतात. मच्छर चावा घेऊन जातो आणि संसर्गजन्य रोग होतो. हे मच्छर नेमके कोणत्या प्रजातीचे आहेत, त्याचा शोध घेणारे मॉड्यूल एका प्राध्यापिकेने विकसित केले आहे. या संशोधनाचे पेटंट प्रकाशित झाले असून, कन्फर्मेशन प्रक्रिया सुरू आहे. 

संवेदक सापळा पटवेल ओळख     

या मॉड्यूलमध्ये १० वेगवेगळ्या डासांच्या प्रजाती संगणक तंत्रज्ञानाच्या मदतीने ओळखल्या जाऊ शकतात. तयार केलेला मच्छर संवेदक सापळा डासांच्या प्रजाती ओळखण्यात सक्षम आहे. कॅमेरा, मायक्रो लेन्सचा, सेन्सरचा वापर करण्यात आला. 

असे केले संशाेधन...

देवगिरी महाविद्यालयात संगणक विज्ञान आणि आयटी विभागात सहायक प्राध्यापक असलेल्या डॉ. आयेशा अनम इर्शाद सिद्दीकी यांच्या ‘डेव्हलपमेंट ऑफ मॉस्किटो सेन्सर ट्रॅप’ या विषयास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नुकतीच पीएच.डी. जाहीर केली. पिवळा ताप, झिका आणि डेंग्यू ही एडिस इजिप्ती डासांद्वारे मानवांमध्ये प्रसारित होणाऱ्या अर्बोव्हायरसची काही उदाहरणे आहेत.मायक्रोसेफली आणि इतर जन्मजात विकृती गर्भधारणेदरम्यान झिका विषाणू संसर्गामुळे होतात. मानवी डोळ्याद्वारे डासांच्या प्रजातींमध्ये फरक करणे, हे आव्हानात्मक काम आहे. डासांच्या प्रजाती ओळखण्यासाठी सूक्ष्मदर्शक आणि कीटकशास्त्रज्ञ आवश्यक आहेत, असे मॉड्यूल डॉ. सिद्दीकी यांनी बनवले.  

या मॉड्यूलचा उपयोग कीटकशास्त्रज्ञ, आरोग्यसेवा कर्मचारी, व्हेक्टर कंट्रोल एजन्सीच्या मदतीसाठी होणार आहे. या अभिनव अशा संशोधनाला पेटंट मिळण्यासाठीचा प्रस्ताव दाखल केला आहे. त्यानुसार हे संशोधन पेटंट कार्यालयाने प्रकाशित केले असून, कन्फर्मेशनची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.     - डॉ. आयेशा सिद्दीकी, संशोधक