शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये लॉकडाऊन करायचा का हे बैठकीनंतरच ठरेल;जिल्हाधिकाऱ्यांकडून महत्त्वाचा खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 14:31 IST

Lockdown in Auranagabad ? रविवारी संध्याकाळी माझ्या निवासस्थानी मनपा, पोलीस प्रमुखाची बैठक होईल. त्यानंतर निर्णय घेण्यात येईल.

औरंगाबाद : शहरात कोविड रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट हा १२ ते १५ टक्क्यांवर पोहोचल्यामुळे शहरातील कोरोना संसर्गाचा विळखा घट्ट होत चालला आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणा लॉकडाऊन करण्याची चाचपणी करत आहे. यावर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी महत्वाचा खुलासा केला असून औरंगाबादमध्ये लॉकडाऊन करण्याबाबत रविवारी होणाऱ्या बैठकीनंतरच ठरेल असे म्हटले आहे. 

शहरात बाधित रुग्णांची संख्या २ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. मार्चच्या २ तारखेपासून हा आकडा ३०० वर गेला आहे. तीन दिवसातच एक हजारापेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. शहरात दररोज किमान दोन हजार नागरिकांची तपासणी होत आहे. बाधित रुग्ण निघण्याचा रेट हा १२ ते १५ टक्के इतका आहे. साधारणपणे ५ टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट असेल तर कोरोना संसर्ग आटोक्यात असल्याचे मानले जाते. यामुळे प्रशासकीय यंत्रणा लॉकडाऊनची चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. यावर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी महत्त्वाचा खुलासा केला असून कोरोनासंसर्ग किती वाढला आहे, त्याचे मूल्यांकन होईल. यानंतर लॉकडाऊन करायचे की नाही, याबाबत जिल्हा आपत्ती निवारण प्रमुख म्हणून मी निर्णय जाहीर करेल असे म्हटले आहे. यासोबतच .लोकांच्या डोक्यात दगड घातल्याप्रमाणे निर्णय होणार नसल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.

''मी रविवारी रुजू होईल. रविवारी संध्याकाळी माझ्या निवासस्थानी मनपा, पोलीस प्रमुखाची बैठक होईल. लोकांच्या डोक्यात दगड घातल्या प्रमाणे निर्णय होणार नाही. लॉकडाऊन करण्याचा निर्णय एकट्याने घ्यायचा नसतो. याबाबत जे काही होईल, ते बैठकीनंतर होईल. लोकांना त्रास होईल असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. कोरोनासंसर्ग किती वाढला आहे, त्याचे मूल्यांकन होईल. यानंतर लॉकडाऊन करायचे की नाही, याबाबत जिल्हा आपत्ती निवारण प्रमुख म्हणून मी निर्णय जाहीर करेल. - सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, औरंगाबाद.''

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद