शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

फक्त कमाईवरच भर! पर्यटननगरी छत्रपती संभाजीनगरात कुठेय ‘ग्रीन इन्व्हेस्टमेंट’?

By संतोष हिरेमठ | Updated: September 27, 2023 13:36 IST

जागतिक वारसास्थळावरील स्थितीकडे राज्य शासनाचा ‘कानाडोळा’च

छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो. यंदा या दिनाची ‘पर्यटन आणि हरित गुंतवणूक’ (टुरिझम अँड ग्रीन इन्व्हेस्टमेंट) ही संकल्पना आहे. राज्याची पर्यटन राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगरचा नेहमीच गौरवाने उल्लेख केला जातो. मात्र, या पर्यटननगरीत ‘ ग्रीन इन्व्हेस्टमेंट’ वाढीची प्रतीक्षाच आहे.

देवगिरी किल्ल्यात (दौलताबाद) एका दिवसात ३०० वर पाण्याच्या बाटल्यांचा ढीग गाेळा करावा लागे. आता या ठिकाणी पर्यटकांकडे प्लास्टिकची पाण्याची बाटली असेल तर त्यांच्याकडून सुरक्षा ठेव म्हणून २० रुपये घेतले जातात. किल्ला पाहून आल्यावर बाटली दाखवून २० रुपये परत घेता येतात. असाच प्रयत्न इतर पर्यटनस्थळीही करण्याची गरज आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे अजिंठा लेणीतील चित्रांना धोका संभवतो. त्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी फर्दापूर टी पाॅइंट ते लेणी मार्गावर एस.टी. बसेस धावत आहेत. वेरुळ लेणीत ई-वाहने धावत आहेत. अजिंठा लेणीसाठी प्रतीक्षाच आहे.

महिनाभरात कुठे किती पर्यटक? (ऑगस्ट)स्थळ- भारतीय पर्यटक- परदेशी पर्यटक- वेरूळ लेणी- ७८,५५५-४१३- बीबी का मकबरा- ५४,२८२-२२८- अजिंठा लेणी - २७,५७८-३४०- देवगिरी किल्ला (दौलताबाद किल्ला) - ३३,११४-१११

प्रत्येकाने वारसा जोपासावापर्यटन दिनानिमित्त भारतीय पर्यटनाच्या सहकार्याने जनजागृतीपर कार्यक्रम घेत आहोत. ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम चालू आहे. पर्यटकांनी आपला सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावा.- डाॅ. शिवकुमार भगत, अधीक्षक (अधीक्षण पुरातत्त्वविद), भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण

‘कार्बन फूट प्रिंट’ कमी रहावेहरित गुंतवणूक म्हणजे अशी गुंतवणूक ज्यातून स्थानिक पर्यटनावर ‘कार्बन फूट प्रिंट’ कमी राहील. पर्यटनासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर, स्थानिकांशी जबाबदारपणे वागणे, सिंगल युज प्लास्टिक, प्लास्टिक बाटल्यांचा वापर न करणे इ. गरजेचे ठरते.- चंद्रशेखर जयस्वाल, महाव्यवस्थापक, एमटीडीसी

वेगळ्या पर्यटनाचाही व्हावा विचारऐतिहासिक स्थळांबरोबर आता वेगळ्या पर्यटनाचाही विचार झाला पाहिजे. गोदावरी नदीच्या बँक वाॅटरमध्ये बोटिंग, वेरुळ लेणीत रोपवेसाठी प्रयत्न केला पाहिजे. टेकड्यांवर जाणाऱ्यांनी जाताना झाडे लावली पाहिजेत आणि येताना ठिकठिकाणी पडून असलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या गोळा कराव्यात.- जयंत गोरे, अध्यक्ष, मराठवाडा टुरिझम डेव्हलपमेंट चेंबर

आम्हीही प्रयत्नशील‘ग्रीन इन्व्हेस्टमेंट’ ही यंदाची थीम आहे. या दृष्टीने आम्हीही प्रयत्नशील आहोत आणि यापुढेही राहू.- उमेश जाधव, सचिव, टुरिस्ट गाईड्स वेल्फेअर असोसिएशन

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबादAjantha - Elloraअजंठा वेरूळ