शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी रहायचे कोठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 03:01 IST

परीक्षेसाठी आलेले विद्यार्थी कोठे राहणार, हा प्रश्न उपस्थित होणार आहेत. यातून विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

राम शिनगारेऔरंगाबाद : राज्यातील विविध शहरांमध्ये सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनची नीट, जेईई, एमपीएससीसह महाविद्यालयीन परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. या परीक्षांसाठी ग्रामीण भागात परतलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शहरात यावे लागणार आहे. या विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था असणारी शेकडो वसतिगृहे कोविड-१९ सेवेसाठी अधिग्रहित केली आहेत. त्यामुळे परीक्षेसाठी आलेले विद्यार्थी कोठे राहणार, हा प्रश्न उपस्थित होणार आहेत. यातून विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.राज्यातील महाविद्यालये, विद्यापीठांमधील अंतिम सत्राच्या परीक्षा होणार की नाही, याचा निर्णय आठवड्यात सर्वोच्च न्यायालय देण्याची शक्यता आहे. याविषयी राज्य शासन आणि विद्यापीठ अनुदान आयोगामध्ये कायद्याची लढाई सुरू आहे. परीक्षा घेण्यावर यूजीसी ठाम असल्यामुळे परीक्षा होण्याची शक्यता अधिक आहे.याशिवाय वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली नीट परीक्षा १३ सप्टेंबर, आयआयटीतील प्रवेशासाठीची जेईई परीक्षा १ ते ६ सप्टेंबर, एमपीएससीची परीक्षा १३ सप्टेंबरला होणार आहे. तसेच राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या सीईटीचाही निर्णय आॅगस्टच्या अखेरपर्यंत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व परीक्षा सप्टेंबरमध्ये आयोजित केल्या जाणार आहेत. काही परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.अशी सर्व परिस्थिती असताना कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या शहरातील बहुतांश शैक्षणिक संस्थांची वसतिगृहे, महाविद्यालये कोविड-१९ च्या सेवेसाठी अधिग्रहित करण्यात आलेली आहेत. समाजकल्याणसह इतर शासकीय वसतिगृहे १०० टक्के अधिग्रहित आहेत. त्यामुळे गावी परतलेले विद्यार्थी परीक्षेसाठी शहरात येणार असतील तर त्यांनी राहयचे कुठे, असा प्रश्न आहे.शासनाने अद्यापतरी पर्यायी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे परीक्षांचा विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत.>कुठे आणि किती शैक्षणिक वास्तू केल्या अधिग्रहितकोरोनाबाधितांवर उपचार, विलगीकरण आणि क्वारंटाईन करण्यासाठी अधिग्रहित केलेले शाळा आणि वसतीगृहांची शहरनिहाय आकडेवारी... कोल्हापूर १६, नागपूर २, उस्मानाबाद ३५, सांगली ५, नाशिक २५, अमरावती २४, वाशिम १३, मुंबई ३५, सातारा २०, रत्नागिरी ७४७ शाळा, पुणे २२, नंदुरबार ६, ठाणे ४, यवतमाळ २६, जळगाव ७, अहमदनगर १८, बीड ११, जालना ११ तर औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील ३५ वसतिगृहे, महाविद्यालयांचा समावेश आहे.