शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांचे कल्याण करणारी समिती गेली कुठे; कारवाई कोण करणार?

By विजय सरवदे | Updated: June 20, 2024 17:52 IST

जि.प. कार्यकारी मंडळ संपुष्टात : अडीच वर्षांपासून अधिकारीच कारभारी

छत्रपती संभाजीनगर : मागील अडीच वर्षांपासून जि.प. कार्यकारी मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यामुळे जि.प. सदस्य हे अध्यक्ष असलेल्या रुग्ण कल्याण समितीची बैठकच झालेली नाही. सध्या या समितीच्या अध्यक्षपदाचा कारभार तालुका आरोग्य अधिकारी हे बघत आहेत. तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या नियमित बैठकीमध्येच रुग्ण कल्याण समिती अंतर्गत निधीतून करावयाच्या खर्चाबाबत निर्णय घेतले जातात.

रुग्ण कल्याण समिती ही नोंदणीकृत समिती असून राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून या समितीला दरवर्षी पावणेदोन लाख रुपयांचा निधी मिळतो. पण, अलीकडच्या काही वर्षांत जवळपास सव्वालाख रुपयांपर्यंत निधी दिला जात आहे. या निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्रांत येणाऱ्या रुग्णांना सुविधा, आरोग्य केंद्रांचा किरकोळ स्टेशनरी खर्च, किरकोळ डागडुजी, औषधांवर खर्च केला जातो. या निधीचा योग्य वापर व्हावा, यासाठी नियंत्रण ठेवणारी समिती म्हणून रुग्ण कल्याण समितीची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या समित्या कार्यरत आहेत. सर्वाधिक बाह्य रुग्ण सेवा देणाऱ्या खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी, फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार, सिल्लोड तालुक्यातील शिवना प्राथमिक आरोग्य केंद्रांत रुग्णांना उत्तम सोईसुविधा दिल्या जातात. त्या ठिकाणी प्रसूतीचे प्रमाणही तुलनेने अधिक असल्याचे दिसून आले.

 जिल्ह्यात ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रेजिल्ह्यात ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी रुग्ण कल्याण समिती असून प्राप्त निधीच्या खर्चाचा आढावा तालुका आरोग्य अधिकारी हे नियमितपणे घेत आहेत.

 काय आहे रुग्ण कल्याण समिती?प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रुग्ण कल्याण समितीची स्थापना करण्यात येते. ही समिती नोंदणीकृत समिती असून, समितीचे अध्यक्ष हे त्या सर्लकचे जि.प. सदस्य, तर सचिवपदी संबंधित आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी असतात.

समितीचे कार्य काय?राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून मिळणाऱ्या निधीतून प्रामुख्याने रुग्ण हा केंद्रबिंदू माणून त्यांना समाधानकारक व गुणवत्तापूर्ण सुविधा, आरोग्य केंद्रांचा किरकोळ स्टेशनरी खर्च, किरकोळ डागडुजी, औषधांवर खर्च केला जातो.

अडीच वर्षापासून बैठकच नाही प्राथमिक आरोग्य केंद्र, बाजारसावंगी : जि.प. सदस्याचा कार्यकाळ संपुष्टात आल्यापासून आता अडीच वर्ष होत आले. त्यामुळे खऱ्या अर्थाने समितीची बैठक नाहीच. अधिकाऱ्यांच्या बैठकीतच याबद्दल निर्णय घेतले जातात. तरीही खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी आरोग्य केंद्र हे गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा देत असल्यामुळे येथील ओपीडी व प्रसूतीचे प्रमाण जास्त आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र, वडोदबाजार फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार आरोग्य केंद्रात अलीकडच्या तीन महिन्यांत ५ हजार ३५६ एवढी ओपीडी आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र, शिवना : सिल्लोड तालुक्यातील शिवना प्राथमिक आरोग्य केंद्रांने अलीकडच्या तीन महिन्यांत ७ हजार ६४६ रुग्णांवर ओपीडीद्वारे सेवा दिली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदMedicalवैद्यकीय