शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

पार्किंग झोनला मुहूर्त कधी लागणार ?

By admin | Updated: July 25, 2014 00:30 IST

जालना : जुना व नवीन जालना या भागात पार्किंग झोन गरजेचे ठरले असून, त्या शिवाय शहर वाहतूक सुरळीत होणार नाही असे चित्र आहे.

जालना : जुना व नवीन जालना या भागात पार्किंग झोन गरजेचे ठरले असून, त्या शिवाय शहर वाहतूक सुरळीत होणार नाही असे चित्र आहे.जुना व नवीन जालना या दोन भागात मोठी वस्ती आहे. बहुतांशी लोकसंख्या याच भागात वास्तव्यास आहे. त्यामुळेच हे दोन्ही भाग अतिशय दाट वस्तीचे ठरले आहेत. परिणाम या भागातील अनेक प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनत आहेत. विशेषत: वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्याचा या दोन्ही भागातील व्यापाऱ्यांसह नागरिकांना मोठा मनस्ताप होतो आहे. दररोज कुरबुरी, वादविवाद, हमरीतुमरी, वेळप्रसंगी भांडणतंटे सुद्धा होत आहेत. मुळात या दोन्ही भागातील रस्ते अरुंद आहेत. या अरुंद रस्त्यांवर दुतर्फा मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे थाटल्या गेली आहेत. विशेषत: व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने ओट्याच्या पुढे अगदी रस्त्यापर्यंत भिडवली आहेत. काही व्यापाऱ्यांनी त्यात छोट्या मोठ्या हॉटेल्स चालकांनी अगदी रस्त्यावरच टेबल खुर्च्या किंवा भट््या थाटल्या आहेत. व्यापाऱ्यांनी शेडस् रस्त्यापर्यंत आणले आहेत. त्यातच फेरीवाल्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळेच रस्ते अधिकच अरुंद झाले आहेत. जुना जालना भागात रेल्वे स्थानक, चमन, शनि मंदिर, मोतीतलाव, लक्कडकोट, भोकरदन नाका, विशाल कॉर्नर, नवीन जालना भागात मामा चौक, महावीर चौक, सराफा, फूल बाजार, सावरकर चौक, कडबीमंडी,शिवाजी पुतळा, पाणीवेस, टांगास्टॅड, बडी सडक, देऊळगाव राजा रोड व मंठा नाका इ. ठिकाणी वाहतुकीची दररोज कोंडी होत आहे. दुचाकी, तीन चाकी,चार चाकी वाहने, ठिकठिकाणी अस्ताव्यस्त उभी राहत आहेत. या वाहनधारकांना शिस्त लावणे गरजेचे आहे. परंतु त्या संदर्भात पालिका प्रशासन व शहर वाहतूक यंत्रणेद्वारे फारसे गांभीर्याने प्रयत्न होत नाहीत. मध्यंतरी या दोन्ही भागातील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. चार आठ दिवस शहर वाहतूक शाखा व पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी इमानेइतबारे मोहीम राबविली. परंतु चार आठ दिवस हे रस्ते खुले झाले खरे मात्र आता ते जैसे थेच अवस्थेत आले आहेत.या पार्श्वभूमीवर जुना व नवीन जालना भागात ठिक ठिकाणी पार्किंग झोन तयार केल्याशिवाय रस्तेवाहुकीचा प्रश्न मिटणार नाही, असे चित्र दिसत आहे. रेल्वेस्थानक व बसस्थानक या दोन्ही ठिकाणी दुचाकी, तीन चाकी वाहनांकरिता जागा उपलब्ध आहेत. परंतु स्थानिक पातळीवरील दुर्लक्षपणामुळे या दोन्ही ठिकाणी पार्किंग झोन उभारण्यात आले नाहीत. या दोन्ही ठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ आहे. प्रवाशांना दररोज नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. वाहनधारकांना शिस्त लागावी म्हणून या दोन्ही ठिकाणी जागा निश्चित करुन पार्किंग झोन उभारता येतील. गांधी चमन, मोती तलाव, अंबड चौफुली, भोकरदन नाका, विशाल कॉर्नर, या ठिकाणी पार्किंग झोन तयार करता येतील. त्यासाठी पर्यायी जागाही उपलब्ध आहेत. परंतु या संदर्भात पालिका व वाहतूक यंत्रणेनेद्वारे काडीचाही विचार होत नाही. असे दुर्दैव आहे. नवीन जालना भागात मंठा चौफुली,शिवाजी चौक, जेईस कॉलेज रोड, देऊळगाव राजा रोड, कन्हैयानगर तसेच मध्य वस्तीतील सावरकर चौक आदी भागात पार्किंग झोन उभारता येतील. त्यासाठी जागाही उपलब्ध आहेत.(प्रतिनिधी)जागेअभावी वाहनचालकांचे हालनवीन व जुना जालना भागात पार्किंग झोनसाठी पालिका प्रशासनाने मध्यंतरी गांभीर्याने विचार केला होता. त्या संदर्भात प्राथमिक आराखडासुद्धा तयार केला होता. परंतु माशी कोठे शिंकली हे कळाले नाही.आराखड्यास ८ जुलैच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी दिल्यानंतर सुद्धा पुढे काडीमात्र कारवाई झाली नाही. एका ओळीच्या ठरावातून सदस्यांनाही या विषयाच्या अनुषंगाने काडीचाही बोध झाला नाही. त्यामुळे या विषयात आता पालिका प्रशासन व शहर वाहतूक यंत्रणेने गांभीर्याने व सकारात्मक विचार करणे गरजेचे ठरले आहे. तरच प्रश्न सुटू शकेल.नवा मोंढा, जुना मोंढा, विशाल कॉर्नर, एमआयडीसी याही भागात जड वाहनांसाठी पार्किंग झोनची गरज आहे. परंतु त्या संदर्भात विचार होत नाही.वास्तविकता एमआयडीसीतील स्टील उद्योग, बियाणे उद्योग ओळखून प्रशासनाने या ठिकाणी मोठ मोठे पार्किंग झोन तयार करणे क्रमप्राप्त आहेत. मात्र, तसे प्रयत्न होतनाही. त्यामुळेच एमआयडीसी ते विशाल कॉर्नर या दरम्यान ठिक ठिकाणी जडवाहने रस्त्याच्या दुतर्फा किंवा रस्त्यावरच उभी असतात. त्यामुळे अपघातास ती वाहने निमंत्रण ठरतात.