शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

औरंगाबादेतील मृत्यूची ही प्रवेशद्वारे कधी बंद करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:37 IST

शहरातील बहुतांश भागांत नाल्यांना जोडणा-या पुलांच्या लगतचा भाग उघडाच आहे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर तो खड्डा दिसून येत नाही.

ठळक मुद्देबेपर्वाई : महापालिकेला कधी जाग येणार?,अतिक्रमण, गाळ - कचऱ्यामुळे नाल्यांची झाली गटारे; अनेक ठिकाणी धोकादायक भगदाडे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील बहुतांश भागांत नाल्यांना जोडणा-या पुलांच्या लगतचा भाग उघडाच आहे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर तो खड्डा दिसून येत नाही. दुर्दैवाने अनेक जण त्या ठिकाणी पडतात. काही जण वाहून जाण्याच्या दुर्घटना घडतात. ही मृत्यूची प्रवशेद्वारेच असून पालिका ती केव्हा बंद करणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

दरवर्षी औरंगाबादकरांना तुडुंब भरणाºया नाल्यांचा त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्याची चाहूल लागताच, मनपाला नालेसफाईची आठवण येते. नेहमीप्रमाणे थातुरमातुर स्वरूपात नाले सफाई करून पावसाळ्याचे चार महिने कसेबसे काढण्यात येतात. पावसाळा संपल्यावर महापालिका नाल्यांकडे ढुंकूनही पाहत नाही. वर्षभर त्यात अतिक्रमण, कचरा, दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य वाढत जाते. शहरात दहा मोठे नाले आहेत. या दहा मोठ्या नाल्यांना जोडणारे लहान ५३ नाले आहेत. वर्षानुवर्ष हे नाले साफ झालेले नाहीत. त्यामुळे गाळासह अतिक्रमणे आहेत. सर्वच नाले घाणीने तुडुंब भरले आहेत. निराला बाजार, सारस्वत बँक, बारूदगर नाला, सिटीचौक, बन्सीलालनगर, जालाननगर, रेल्वेस्टेशन, पद्मपुरा आदी भागातील नाल्यांची अशीच अवस्था आहे़जयभवानीनगर, एन-४, पुंडलिकनगर, गजानन कॉलनी, एन-८, एन-६, गांधीनगर, किराडपुरा, औषधी भवन, बंजारा कॉलनी, जालाननगर, ईटखेडा येथील नाले अतिक्रमणांनी आणि गाळाने गच्च भरले आहेत. शहरात तासभर धो-धो पाऊस पडला की, पावसाच्या पाण्याला जाण्यासाठी जागा नसल्यामुळे ते घरे, दुकाने, तळघर, गोदामांमध्ये शिरते.पाणी वाहून नेण्याची क्षमता संपल्यामुळे शहराला नाल्यांमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ मागील अनेक वर्षांपासून नाले अतिक्रमण मुक्त होण्याची वाट पाहत आहेत.नाल्यावर२५०० अतिक्रमणेनाल्यावर २५०० अतिक्रमणे असल्याचा अहवाल २०१४-१५ मध्ये तयार करण्यात आला होता. सद्य:स्थितीत अतिक्रमणे वाढली असतील. भूमी अभिलेख विभागाने पाहणी करून तो अहवाल दिला होता.त्यानुसार अतिक्रमणे पाडण्याची कारवाई झाली असती तर जयभवानीनगरमध्ये एवढी आपत्ती ओढवली नसती. चार वर्षांपासून नालेपाहणी आणि आश्वसनांपलीकडे काहीही समोर आलेले नाही. शहरातील सर्व नाल्यांवरील अतिक्रमणे काढण्याची गरज आहे.नाल्यांवरील अतिक्रमणे काढण्याची गरजऔरंगाबाद : महापालिका हद्दीत बांधकामांचे भविष्यकालीन नियोजन नसणे, नाल्यांवर मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण, अर्थ हव्यासापोटी नाल्यांच्या बदललेल्या नैसर्गिक प्रवाहांमुळे शहरातील नाल्यांत साचलेला गाळ औरंगाबादकरांना या पावसाळ्यात त्रासदायक ठरण्याचे संकेत आहेत़ नैसर्गिक नाल्यांची नाली झाल्यामुळे औरंगाबादकरांना दरवर्षीचा पावसाळा धोकादायक ठरतोच आहे़परिस्थिती ‘जैसे थे’चोंडेश्वरी हाऊसिंग सोसायटी येथे येऊन आम्हाला तीन वर्षे झाली आहेत. तेव्हापासून आतापर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. दोन महिन्यांपूर्वी एक दुचाकीचालक गाडीसहित गटारीत वाहून गेला होता. स्थानिकांनी त्याला त्वरित वर काढले. जे जयभावनीनगरला घडले ते येथे कधीही घडू शकते, असे पार्वती मकरिये यांनी सांगितले.चुकीची माहिती देऊनप्लॉट विक्रीमागील १० वर्षांपासून लक्ष्मी कॉलनी परिसरात राहत आहेत. चुकीची माहिती देऊन प्लॉट विक्री झाल्याचे मनपाने कार्यवाही केली तेव्हा समजले. कारवाई दोन खोल्या पाडल्या गेल्या. आमचे मोठे नुकसान झाले ते सहन केले; पण आता हा नवीन प्रश्न उद्भवला आहे. नाल्यातून पाणी प्रवाह पुढे जाण्यासाठी जागाच नसल्याने घराच्या दरवाजासमोरच घाण पाणी साचत आहे, असे अनिता पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEnchroachmentअतिक्रमण