शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये वंदे मातरम् सुरु असताना एमआयएमच्या नगरसेवकांनी सोडले सभागृह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 15:52 IST

औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वंदे मातरम् सुरु असताना एमआयएम् गटनेता नासेर सिदीकी, नगरसेविका समीना शेख, नगरसेवक जफर शेख यांनी सभागृह सोडले.

औरंगाबाद, दि. 19 - औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वंदे मातरम् सुरु असताना एमआयएम् गटनेता नासेर सिदीकी, नगरसेविका समीना शेख, नगरसेवक जफर शेख यांनी सभागृह सोडले. वंदे मातरम् संपल्यावर ते सर्व सभागृहात परत आले. यावर प्रसार मध्यमाशी बोलताना समीना शेख, सैयद मतीन यांनी आमचा धर्म मान्यता देत नाही या पुढे आम्ही वंदे मातरम् सुरु असताना बाहेर जाणार असे सांगितले. सारे जहाँ से अच्छा हे गीत घ्या अशी मागणी त्यांनी केली.

काही दिवसांपूर्वी औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत 'वंदे मातरम्' म्हणण्यावरुन वाद झाला होता.  एमआयएमच्या नगरसेवकांनी 'वंदे मातरम्' म्हणण्यास विरोध केल्याने मनपाच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ झाला होता. 

औरंगाबाद महापालिकेच्या सभागृहात एमआयएमच्या नगसेकांनी 'वंदे मातरम्' म्हणण्यास विरोध केल्यानं यावेळी शिवसेना-भाजपाचे नगरसेवक आक्रमक झाले.  एमआयएमचे नगरसेवक व शिवसेना-भाजपाच्या नगरसेवकांमध्ये राडा देखील झाला  तसेच एमआयएमचे नगरसेवक व युतीच्या नगरसेवकांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू करत गोंधळ घातला होता. 

सर्वसाधारण सभेत नेमके काय घडलेमहापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ' वंदे मातरम्'  सुरू असताना बसून राहिलेल्या एमआयएम व काँग्रेसच्या दोन नगरसेवकांना निलंबित करण्यासाठी शिवसेना व भाजपा यांनी आक्रमक पवित्रा घेत सभेत गोंधळ घातला. अखेर महापौरांनी एमआयएमचे सय्यद मतीन व काँग्रेसचे सोहेल शेख या दोघांचे एक दिवसासाठी निलंबन केले आहे. 

'वंदे मातरम्' म्हणण्याला विरोध दर्शवण्यासाठी एमआयएमचे सय्यद मतीन व काँग्रेसचे सोहेल शेख हे नगरसेवक सर्वसाधारण सभेत 'वंदे मातरम्' सुरू असताना बसून राहिले होते. यावर शिवसेना व भाजप सदस्यांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दोन्ही नगरसेवकांना निलंबित करण्याची मागणी करत युतीच्या सदस्यांनी सभागृह डोक्यावर घेतले. या गदारोळानंतर शेवटी महापौर भगवान घडामोडे यांनी सय्यद मतीन व सोहेल शेख या दोन्ही नगरसेवकांना एक दिवसासाठी निलंबित केले.

वंदे मातरम् कदापि म्हणणार नाही - अबू आझमीदरम्यान, काही दिवसांपूर्वी  तामिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रातही ‘वंदे मातरम’ म्हणण्याची सक्ती करण्याच्या मुद्यावरून नव्या वादाला तोंड फुटले होते. ‘आम्हाला देशातून बाहेर काढलं तरी चालेल, पण आम्ही कधीही वंदे मातरम म्हणणार नाही’, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले होते.

मद्रास हायकोर्टाने तामिळनाडूतील सर्व शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांमध्ये आठवड्यातून किमान एकदा वंदे मातरम् म्हणण्याची सक्ती केली आहे. महाराष्ट्रातही तशी सक्ती लागू करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी पत्रकारांना सांगितले होते.