शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

कुटुंबाला सावरतानाच भारताचे प्रतिनिधित्व करायचेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:43 AM

मुलांप्रमाणेच आता मुलीही राष्ट्रीय पातळीवर मराठवाड्याचा विशेष ठसा उमटवत आहेत. नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या खेलो इंडियाअंतर्गत राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत औरंगाबादच्या प्रतिभावान खेळाडू ज्योती मुकाडे आणि मयुरी पवार यांनी महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून देण्यात निर्णायक योगदान दिले. घरची परिस्थिती प्रतिकूल असल्यानंतर जबरदस्त जिद्दीने खो-खोचे मैदान गाजवणाºया या औरंगाबादच्या धडाकेबाज खेळाडूंचे लक्ष्य आहे ते आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करायचे. त्याचबरोबर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे.

ठळक मुद्देकुटुंबाला सावरतानाच भारताचे प्रतिनिधित्व करायचेय

जयंत कुलकर्णी ।औरंगाबाद : मुलांप्रमाणेच आता मुलीही राष्ट्रीय पातळीवर मराठवाड्याचा विशेष ठसा उमटवत आहेत. नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या खेलो इंडियाअंतर्गत राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत औरंगाबादच्या प्रतिभावान खेळाडू ज्योती मुकाडे आणि मयुरी पवार यांनी महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून देण्यात निर्णायक योगदान दिले. घरची परिस्थिती प्रतिकूल असल्यानंतर जबरदस्त जिद्दीने खो-खोचे मैदान गाजवणाºया या औरंगाबादच्या धडाकेबाज खेळाडूंचे लक्ष्य आहे ते आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करायचे. त्याचबरोबर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे.ज्योती मुकाडे हिची घरची परिस्थिती खूपच प्रतिकूल आहे; परंतु आपल्या मुलीची खेळात चांगली कारकीर्द घडावी यासाठी तिचे वडील दत्ताराव मुकाडे हे रात्रंदिवस रिक्षा चालवतात. दुसरीकडे मयुरी पवार हिची घरची परिस्थितीही तशी सर्वसाधारणच आहे. तिचे वडील वसंतराव पवार हे लायब्ररियन. तरीदेखील ज्योती आणि मयुरी यांनी गेल्या काही वर्षांत उंच गरुडझेप घेताना महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आणि विजेतेपद मिळवून देण्यातही निर्णायक योगदान दिले. नवी दिल्ली येथे झालेल्या ‘खेलो इंडिया’अंतर्गत राष्ट्रीय स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मॅटवर खेळल्याचा अनुभव भविष्यासाठी खूप लाभदायक ठरेल. तसेच अनेक राष्ट्रीय खेळाडू संघात असल्यामुळे आम्हीच जिंकणार असा आपल्याला विश्वास होता, असे ज्योतीने सांगितले. मयुरीने या स्पर्धेत महाराष्ट्र हा विजेतेपदाचा दावेदार असल्यामुळे सगळेच प्रतिस्पर्धी संघ आम्हाला पराभूत करण्यास आतुर होते; परंतु प्रतिस्पर्धी चांगला असला तरी आमच्या संघातही दर्जेदार आणि अनुभवी खेळाडूंचा समावेश आम्ही इतरांच्या तुलनेत कमी नाही असे आम्हाला वाटत होते, असे तिने सांगितले. विशेष म्हणजे ज्योती आणि मयुरी या दोघीही धर्मवीर शाळेच्या विद्यार्थिनी असून त्या दोघीही बरोबरच सराव करतात. सद्य:स्थितीत औरंगाबादच्या सर्वात अव्वल खेळाडूंत समावेश असणाºया ज्योतीने तुल्यबळ आ. कृ. वाघमारे संघाविरुद्ध एकाच डावात ९ विकेट आणि ५ मिनिटे संरक्षण केले होते, तर मयुरीने नाशिक येथील राष्ट्रीय स्पर्धेत कर्नाटकविरुद्ध अंतिम सामन्यात ३ मिनिटे संरक्षण करताना उपस्थितांची वाहवा मिळवली होती.या दोघींचेही ध्येय मात्र सारखेच आहे. ज्योती आणि मयुरी यांना खो-खो खेळातच कारकीर्द करायची असून त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करायचे. त्याचबरोबर घराची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे ज्योतीचे लक्ष्य आहे, तर आपल्या कमाईवर आई-वडिलांना घर बांधून देण्याचा मानस मयुरी पवार हिचा आहे. दररोज ३ तास सराव करणाºया ज्योती व मयुरी यांना प्रशिक्षक अविनाश शेंगुळे यांच्यासह विनायक राऊत आणि संजय मुंडे यांचे मार्गदर्शन लाभते. तसेच वेळोवेळी संघटनेचे सचिव गोविंद शर्मा यांचे सहकार्य मिळत असल्याचे या दोघींनी सांगितले.औरंगाबादची जबरदस्त अष्टपैलू खेळाडू असणारी ज्योती ही मूळची कळमनुरी येथील; परंतु घरची परिस्थिती प्रतिकूल असली तरी ज्योती व तिच्या भावाला चांगले शिक्षण मिळावे यासाठी तिचे वडील औरंगाबादेत आले. ११ वी इयत्तेत शिकणाºया ज्योतीला इयत्ता आठवीत असताना औरंगाबादची राष्ट्रीय खेळाडू सलोनी बावणे हिला खो-खो खेळताना पाहिले आणि त्याचवेळी तिला खो-खो खेळात रस निर्माण झाला आणि त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिले नाही. काही महिन्यांतच तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेल्या निवड चाचणीतून महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आणि त्यानंतर तिने २०१४ मध्ये करीमनगर, २०१६ मध्ये छत्तीसगढ आणि २०१७ मध्ये मध्यप्रदेशातील उमरिया येथील आणि नवी दिल्ली येथील खेलो इंडिया राष्ट्रीय महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. विशेष म्हणजे मध्यप्रदेशातील या स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ चॅम्पियन ठरला होता, तर इयत्ता आठवीत असणाºया एका वर्षाच्या आतच २०१६ मध्ये देवास, २०१६ मध्येच नाशिक आणि खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. विशेष म्हणजे ज्योती मुकाडेचा खेळ पाहून मयुरी खो-खो खेळाकडे वळाली.ज्योती, मयुरीचे भवितव्य उज्वल‘खेलो इंडिया’ राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून देण्यात योगदान असणाºया औरंगाबादच्या ज्योती मुकाडे आणि मयुरी पवार यांचे भवितव्य उज्वल आहे; परंतु त्यांनी सातत्यपूर्वक चांगली कामगिरी करावी आणि या खेळाकडे कारकीर्द म्हणून पाहायला हवे, असे मत राज्य खो-खो संघटनेचे सरचिटणीस चंद्रजित जाधव यांनी व्यक्त केले. या दोघींना आगामी सहा महिन्यातच आपण एअरपोर्ट अ‍ॅथोरिटीमार्फत कॉन्ट्रॅक्ट अथवा शिष्यवृत्ती मिळवून देऊ असा शब्दही चंद्रजित जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.