नांदेड : एकाकी पदावरील कर्मचाऱ्यांना सुधारीत ग्रेड वेतन देण्याचा निर्णय २ जुलै रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला.यासंदर्भातील शासन आदेश अद्यापही निघाला नाही. वाढीव वेतन मिळणे तर दूरच राहिले.पदोन्नतीची संधी नसलेल्या म्हणजेच एकाकी पदावरील कर्मचाऱ्यांना सुधारित सेवातंर्गंत आश्र्वासीत प्रगती योजनेतील ग्रेडवेतनामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय झाला. यासाठी अंदाजे ९ कोटी रुपये वार्षीक खर्च शासनाच्या तिजोरीवर वाढणार आहे. १२ वर्ष नियमीत सेवेनंतरही पदोन्नतीमध्ये कुंठीतता राहिल्यास सुधारित सेवातंर्गंत आश्र्वासीत प्रगती योजनेत त्याला पदोन्नतीच्या पदाची वेतनश्रेणी लागू केली जाते. या योजनेत दुसरा लाभ पहिल्या लाभानंतर १२ वर्षाच्या सेवेनंतर लागू केला जातो. मात्र, काही पदे एकाकी असल्याने अशा पदांना विशीष्ठ वेतन संरचना(ंअतिरिक्त ग्रेडवेतन) १२ आणि २४ वर्षांनी लागू केली आहे. या पदांना मिळणारा आर्थिक लाभ तुलनेने कमी असल्याने ही वाढ देण्यात आली. (प्रतिनिधी)
वाढीव ग्रेड पे कधी?
By admin | Updated: August 8, 2014 00:34 IST