शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दूध शीतकरण केंद्रास घरघर

By admin | Updated: June 16, 2014 01:16 IST

उमरगा : गेल्या २५ वर्षापासून कार्यरत असलेल्या येथील शासकीय दूध शीतकरण केंद्राकडे शासनाच्या दुग्धविकास विभागाने पाठ फिरविल्याने या दुग्ध शितकरण केंद्रास शासकीय उदासिनता निर्माण झाली

उमरगा : गेल्या २५ वर्षापासून कार्यरत असलेल्या येथील शासकीय दूध शीतकरण केंद्राकडे शासनाच्या दुग्धविकास विभागाने पाठ फिरविल्याने या दुग्ध शितकरण केंद्रास शासकीय उदासिनता निर्माण झाली असून, तालुक्यातील हजारो दुग्ध उत्पादकांना आर्थिक दिलासा देणाऱ्या येथील दूध शितकरण केंद्रास अखेरची घरघर लागली आहे. तालुक्यातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी १९८२ साली पतंगे रोड भागातील खरेदी विक्री संघाच्या गोडाऊनमध्ये दुध शितकरण केंद्राची उभारणी करण्यात आली. दहा वर्षानंतर सदरचे केंद्र राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या खरेदी विक्री संघाच्या जागेत स्थलांतर करण्यात आले आहे. खाजगी दुग्ध संकलन केंद्राच्या स्पर्धेमुळे या दूध केंद्राला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या केंद्रात रसाय्न तंत्रज्ञ, व्यवस्थापक, दूधसंकलन पर्यवेक्षक, लिपिक प्रयोगशाळा सहायक, दूध परिचर अशी ११ कर्मचाऱ्यांची पदे कार्यरत आहेत. उत्पादनापेक्षा या केंद्राच्या व्यवस्थापनावर जास्तीचा खर्च केला जात आहे. वीजबिल, कर्मचारी वेतन, किरकोळ दुरुस्ती यावर पलतवर्षी लाखो रुपयांचा खर्च केला जात आहे. २००९ साली बंद पडलेले हे केंद्र आ. चौगुले, प्रा. गायकवाड यांच्या प्रयत्नानंतर चालू झाले. या केंद्राअंतर्गत एकेकाळी आठ ते दहा हजार लिटर दुधाचे संकलन केले जात होते. मात्र खाजगी दूध संकलन केंद्रामध्ये उत्पादकांच्या दुधाला चांगली किंमत मिळत असे. खाजगी संकलन केंद्रात २५ रुपयाने तर शासकीय दूध संकलन केंद्रात २० रुपये लिटरने दूध खरेदी होत होती. दुधातील स्रिग्धता न बघता खाजगी दूध संकलन केंद्राकडून दुधाची खरेदी होत असल्याने या शासनाच्या दूध डेअरीकडे दूध उत्पादकांनी पाठ फिरविली आहे. या दूध केंद्राला कासारशिरसी, मातोळा, मुळज, येणेगूर या खाजगी दूध संकलन केंद्राच्या स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. एकूणच सद्यस्थितीत जागेची अडचण खाजगी दूध संकलन केंद्राच्या तुलनेत मिळणारे प्रतिलिटर दुधाचे दर यामुळेच या दुध संकलन केंद्राकडे दुग्ध उत्पादकांनी पाठ फिरविल्याने केंद्र अडचणीत आल्याचे दिसते. (वार्ताहर)दूध केंद्र एमआयडीसीत हलवादूध शितकरणास शहरात कोठेही सोयीस्कर जागा उपलब्ध होत नसल्याने सदरचे केंद्र येथील एमआयडीसी भागात स्थलांतरित करण्याची गरज आहे. दुग्ध उत्पादनवाढीसाठी दुग्धउत्पादकांना सवलतीच्या दराने गायी म्हशी द्याव्यात. कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी निवासस्थाने आधुनिक सुविधा, दूध उत्पादकांना वाढवून भाव दिल्यास समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या शासनाच्या या दूध शितकरण केंद्रास पुन्हा उभारी मिळेल, असे मत प्रमोद भोसले यांनी व्यक्त केले आहे. लाखो रुपयांची मशिनरी धूळखातया दूध केंद्रात दूध शितकरणासाठी दोन शितकरण टाकी पाच हजार लिटर क्षमतेची दूध साठवण टाकी, जनरेटर, दूध तपासणी प्र्रयोगशाळा सामुग्री, २५ ते ३० लाखाचे साहित्य अपुऱ्या दूध संकलनामुळे योग्य वापराअभावी धूळखात पडून आहे.महिनाभरात इमारत रिकामी करा१९९१ पासून येथील खरेदी विक्री संघाच्या जागेत उभारण्यात आलेल्या या शितकरण केंद्रास एक महिन्याच्या आत जागा रिकामी करण्याची नोटीस खरेदी विक्री संघाच्या वतीने दिली आहे. स्वत:च्या मालकीची इमारत नसल्याने सदरचे दूध शितकरण केंद्र आता कुठे स्थलांतरित करायचे? असा सवाल दुग्धविकास प्रशासनाला पडला आहे.