शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

काय असेल या वेळेस ‘मध्य’म मार्ग?

By admin | Updated: June 13, 2014 01:11 IST

शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद लोकसभेतील दणदणीत यशाने महायुतीतील अनेकांच्या आशा पल्लवित झाल्याने युतीच्या उमेदवारांची यादी दिवसागणिक वाढत आहे,

शांतीलाल गायकवाड , औरंगाबादलोकसभेतील दणदणीत यशाने महायुतीतील अनेकांच्या आशा पल्लवित झाल्याने युतीच्या उमेदवारांची यादी दिवसागणिक वाढत आहे, तर निवडणुकीत एका पराभवाने खचणे हा काँग्रेस आघाडीचा स्वभावधर्म नाही. त्यामुळे आघाडीकडूनही मातब्बर मंडळी औरंगाबाद मध्यमधून लढण्यासाठी शड्डू ठोकत आहे. अर्थात, या वेळेस मनसे, आम आदमीसह रिपाइं आदी अनेक पर्याय मतदारांसमोर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. युती व आघाडीला पर्याय म्हणून समोर आलेले तत्कालीन अपक्ष उमेदवार प्रदीप जैस्वाल यांचा मध्यम पर्याय मतदारांनी स्वीकारला होता. यावेळेस संदर्भ व परिस्थितीही बदलली आहे. २००८ मध्ये झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत औरंगाबाद शहरात विधानसभेचे पूर्व, पश्चिम व मध्य, असे तीन मतदारसंघ तयार झाले. त्यात मध्य मतदारसंघ नव्याने तयार करण्यात आला. औरंगाबाद मध्य मतदारसंघ हा शहराचा मुख्य भाग आहे. गेल्या २५ वर्षांपासून महापालिकेत युतीची सत्ता आहे. या सत्तेने शहरवासीयांना काय दिले? याचा लेखाजोखा प्रत्येक निवडणुकीत उपस्थित केला जातो; परंतु निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात धार्मिक भावनेवर मतदारांचे ध्रुवीकरण होत असल्याचा अनुभव येथे कायम येतो. शिवसेनेशी बंडखोरी करून अपक्ष निवडून आलेले प्रदीप जैस्वाल अडीच वर्षांपूर्वी पुन्हा स्वगृही परतले व या मतदारसंघातील गणिते पुन्हा बदलली. दरम्यान, लोकसभेतील विजयामुळे युतीकडे उमेदवारांचा लोंढा वाढला आहे. विद्यमान आ. प्रदीप जैस्वाल यांचा या मतदारसंघावर पहिला दावा राहणार असला तरी माजी आमदार किशनचंद तनवाणी, सहसंपर्कप्रमुख सुहास दाशरथे यांचीही नावे चर्चेत आहेत. जैस्वाल यांनी शिवसेनेत पुन्हा प्रवेश केल्यामुळे त्यांच्या बाजूने झुकलेले दलित, मुस्लिम मतदार या वेळेस काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असली तरी या मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार १,९१६ मतांनी मागे राहिला. दिलासा एवढाच की २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार ४ हजार ९६६ मतांनी मागे होता, या वेळेस त्यात किंचित सुधारणा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या वेळेस या मतदारसंघातून कदीर मौलाना यांना उमेदवारी दिली. लोकसभेत काँग्रेस उमेदवाराला मताधिक्य देणाऱ्या या मतदारसंघाने कदीर मौलाना यांचा ८,३८४ मतांनी पराभव केला होता. त्याचे कारण प्रदीप जैस्वाल यांना सर्वधर्मीयांनी केलेले मतदान हे होते. या वेळेस हे गणित बदललेले दिसत आहे. शिवाय राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? यावर बरेच अवलंबून आहे. राष्ट्रवादीकडून शहर कार्याध्यक्ष विनोद पाटील, कदीर मौलाना व अफसरखान यांनी तिकिटासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याशिवाय मनसेकडून तिकीट मिळावे यासाठी नगरसेवक राज वानखेडे, गणेश वानखेडे, दिलीप चितलांगे, सतनामसिंग गुलाटी आदींची फिल्डिंग लावणे सुरू आहे. आम आदमी पार्टीही आपला उमेदवार रिंगणात उतरविणार आहे. नगरसेवक मिलिंद दाभाडे यांनीही तयारी सुरू केली आहे. पूर्वाश्रमीच्या औरंगाबाद पश्चिमवर १९८५ पर्यंत काँग्रेसचे आधिपत्य राहिले आहे. या मतदारसंघाने १९९० मध्ये पहिल्यांदाच शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना कौल दिला. त्यानंतर १९९९ व २००४ मध्ये काँग्रेसचे राजेंद्र दर्डा यांनी शिवसेनेचे अनुक्रमे गजानन बारवाल व प्रदीप जैस्वाल यांना पराभूत केले होते. त्यानंतर २००९ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना होऊन तयार झालेला मतदारसंघ काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात गेला; परंतु राष्ट्रवादीला हा मतदारसंघ गेल्या निवडणुकीत आपल्याकडे राखता आला नाही. महापालिकेचे ३४ वॉर्ड या मतदारसंघात येतात. दलित व मुस्लिमबहुल असलेल्या मतदारसंघातून अपक्ष १०, शिवसेना १३, भाजपा ४, काँग्रेस २, राष्ट्रवादी ४ व मनसेचा एक नगरसेवक आहे. अपक्ष नगरसेवकांमध्ये मुस्लिम व दलित नगरसेवकांची संख्या अधिक आहे. युतीच्या नगरसेवकांची संख्या १७ आहे; परंतु युतीचे विकास जैन यांना गेल्या वेळेस मोठा मानहानिकारक पराभव पत्करावा लागला आहे. त्याचे कारण विद्यमान आ. प्रदीप जैस्वाल यांना मुस्लिमांसह दलित मतदारांची मिळालेली मोठी सहानुभूती हे होय.२००९ : प्रमुख ३ उमेदवारांची मते