धारूर : धारूर डोंगरपट्ट्यातील सीताफळाला सर्वत्र मोठी मागणी असते. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने सीताफळाचे उत्पादन वाढले आहे. यंदा भावही चांगला आहे. येथे सीताफळांचा रोज बाजार भरत असून, राज्यासह शेजारील राज्यातही या रानमेव्याला मागणी असून, त्यामुळे ग्रामीण भागातील मजुरांना हाताला काम मिळत आहे .हा परिसर डोंगराळ असून, नैसर्गिकरीत्या आलेली सीताफळाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. खाजगी डोंगराप्रमाणेच धारूर वन परिक्षेत्रातही सहा हजार हेक्टर जमिनीत मोठ्या प्रमाणात सीताफळाची झाडे आहेत. काही प्रमाणात वन विभागाने लागवडही केली आहे. प्रतिवर्षी वन विभाग या सीताफळाचा लिलावही करते. येथील सीताफळाला गोडी असल्यामुळे मोठी मागणी आहे. व्यापारी खरेदीसाठी येथे येतात.ग्रामीण भागातील मजुरांना या माध्यमातून रोजगार मिळतो मागील दोन-तीन वर्षांत पावसाअभावी सीताफळाचे उत्पादन कमी होते; मात्र या वर्षी झालेल्या भरपूर पावसामुळे सीताफळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. या परिसरात वन विभागाचा लिलाव जे घेतात ते मजुरांमार्फत सीताफळ विक्री करतात. गाठोडे पध्दतीने सीताफळे विकली जातात. खाजगी डोंगरावर फिरून मजूर लोक सीताफळे जमा करून गावात लागणाऱ्या फडीवर किंवा धारूर येथे आणतात किंवा रस्त्याच्या बाजूला बसूनही सीताफळे विकली जातात. एका गाठोड्यात १००-१५० सीताफळे असतात. हे गाठोडे सीताफळाच्या दर्जानुसार १०० रुपयांपासून २५०-३०० रुपयांपर्यंत विकले जाते.
‘रिलायन्स ट्रेन्डझ’ची बिदागी कुणाच्या खिशात ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2016 00:11 IST