शैलेश स्वामी , लातूरलातूर शहराच्या इतिहासाला अद्भुतपूर्व पाणीटंचाई डाग लावते आहे. विशेष म्हणजे हा डाग लागताना पालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी काळा रंग घेऊन काळाला मदत करीत आहेत. खांदेपालटात चेहरे बदलले, मात्र पालिकेच्या कारभारात काय बदल झाला ? हा विषय संशोधनाचा ठरतोय. हे लिहायचे कारण म्हणजे गेल्या दीड वर्षांपासून लातूरच्या मानगुटीवर बसलेल्या पाणीटंचाईचे धुके यंदाही दाट आहे. दीड वर्षात महपालिकेने बोध काय घेतला ? पाऊसभरोसे पालिका ढग नाही बरसले तर काय नियोजन करणार ? पालिकेत आयुक्त बदलीचे ठाणे गाठायचे तयारीत अन् अजूनही सत्काराच्या लगीनघाईत गुंतलेल्या महापौराच्या अंगाची हळद जाईना. म्हणूनच हे खुले पत्र. (संबधित वृत्त हॅलो २ वर)
टंचाईत काय घेतला बोध ?
By admin | Updated: July 15, 2016 00:50 IST