विजय गायकवाड , वैजापूरआगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तालुक्यात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभा मतदारसंघात गेल्या १५ वर्षांपासून शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. सेनेच्या या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. तालुक्यात सध्या सत्तेची तीन केंद्र आहेत. नगरपालिका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेस व कृषी उत्पन्न बाजार समितीवर सेनेचे निर्विवाद वर्चस्व आहे. याशिवाय गेल्या १५ वर्षांपासून आमदारकी सेनेक डेच आहे. सेनेचे आ. आर.एम.वाणी यांनी गेल्या १५ वर्षांपासून सेनेचा बालेकिल्ला अबाधित ठेवला आहे. दोन पंचवार्षिक निवडणुकीत आ.वाणी यांनी चांगले मताधिक्य घेऊन विजयश्री खेचून आणली. गेल्या निवडणुकीत मात्र त्यांची दमछाक झाली. त्यांना फक्त १२०० मतांनी विजय मिळविता आला. त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हे त्यांच्या खालोखाल राहिले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे डॉ.दिनेश परदेशी यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्या मानाने ऐनवेळी जाहीर झालेली उमेदवारी व प्रचारासाठी कमी मिळालेल्या वेळेत डॉ. परदेशी यांनी ४० हजार मते मिळविली. चिकटगावकरांना ५० हजार मते मिळाली होती. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनेचे आ.आर.एम.वाणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, काँग्रेसचे डॉ. दिनेश परदेशी या तीन नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या सर्वांनीच खाजगी कार्यक्रमांसह गेल्या काही दिवसांत जनसंपर्क व गाठीभेटी सुरू केल्या आहेत. याशिवाय भाजपाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, रामहरी जाधव, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ यांनीही निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी दर्शविली आहे. विशेषत: काँग्रेसमध्ये निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची मोठी भाऊगर्दी आहे. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील निकम, ज्ञानेश्वर जगताप, जे.के.जाधव, यांच्या ‘महत्त्वाकांक्षाही’ उचल खात आहेत. सेनेमध्ये आ. वाणी यांच्याशिवाय दुसऱ्या फळीतील काही कार्यकर्त्यांची इच्छाशक्ती आहे; परंतु सेना नेत्याच्या एकहाती सूत्रामुळे या कार्यकर्त्यांना आपली इच्छाशक्ती ‘दाबून’ धरण्याशिवाय पर्याय नाही. स्थानिक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांमध्ये एकी नसल्याचा फायदा आ. वाणींना होतो. त्यामुळेच सेनेचा हा विजयरथ रोखण्यात १५ वर्षे आघाडीला अपयश आले. आ. वाणी यांना मिळालेली मते आणि लढतीतील विरोधकांना मिळालेल्या मतांची बेरीज अधिक असते. नगरपालिकेत गेल्या १५ वर्षांपासून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे; परंतु ऐनवेळी विधानसभा निवडणुकीत आघाडीत ‘बिघाडी’ ठरलेली आहे. दोन्ही काँग्रेसमध्ये इच्छुकांच्या महत्त्वाकांक्षेमुळे मतविभाजन होऊन त्याचा फायदा विरोधकांना होतो. सद्य:परिस्थितीतही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील ‘मधुर’ संबंध मतदारसंघातील जनतेला ठाऊक आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसमधील नेते काय भूमिका घेतात, यावरच समीकरणे अवलंबून राहणार आहेत. सेनेला फक्त काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच कट्टर विरोधक आहे. अन्य पक्षांचे उमेदवार जरी आखाड्यात असले तरी त्याचा फारसा परिणाम होईल, असे आजतरी वाटत नाही. २००९ : प्रमुख ३ उमेदवारांची मतेशिवसेनाआर. एम. वाणी५१३७९काँग्रेसदिनेश परदेशी३९५५७अपक्षभाऊसाहेब चिकटगावकर५0१५४इच्छुकांचे नाव पक्षआ. आर.एम.वाणीशिवसेनादिनेश परदेशीकाँग्रेससंजय पा. निकमकाँगे्रेसभाऊसाहेब पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसएकनाथ जाधवभाजपाप्रशांत सदाफळमनसे
वैजापुरात आघाडीने कंबर कसली
By admin | Updated: June 11, 2014 00:53 IST