शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

नेमके करावे तरी काय; औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णसंख्येत चढ-उताराने आरोग्य यंत्रणाही त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 12:41 IST

गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांचा जीव वाचविण्यात आरोग्य यंत्रणेला मोठी कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्दे नागरिक नियम पाळायला तयार नाहीत पॉझिटिव्ह रुग्ण वाढू लागल्याने आरोग्य विभागाच्या चिंतेत भर

औरंगाबाद : कोरोना रुग्णांची संख्या आज झपाट्याने वाढलेली असते, तर दुसऱ्या दिवशी संख्या अत्यंत कमी झालेली असते. रुग्णसंख्येतील या चढ-उतारामुळे आरोग्य यंत्रणा त्रस्त झाली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात तरी कशी आणावी, असा प्रश्न यंत्रणेला पडला आहे. मागील पंधरा दिवसांत रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत असल्यामुळे चिंता अधिक वाढू लागली आहे. 

महापालिका हद्दीत सध्या ३ हजार ९४३ म्हणजे जवळपास चार हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लक्षणे नसलेल्या रुग्णांवर उपचार करणे सोपे जात आहे. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांचा जीव वाचविण्यात आरोग्य यंत्रणेला मोठी कसरत करावी लागत आहे. शनिवारी दिवसभरात २३२ रुग्ण दाखल झाले, तर १४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण वाढू लागल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंतेत भर पडत आहे. मागील पंधरा दिवसांच्या रुग्णसंख्येवर नजर फिरवली असता कमालीचा चढ-उतार दिसून येत आहे.

जिल्ह्यात खाटा संनियंत्रणासाठी कक्ष01. जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात खाटा उपलब्ध करणे व त्याचे संनियंत्रण करणे, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशान्वये काही अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.02. यामध्ये उपायुक्त पशुसंवर्धन प्रशांत चौधरी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सुरेखा माने, सहायक विक्रीकर आयुक्त गजानन जोशी, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी हर्षा देशमुख, सहायक आयुक्त विक्रीकर योगेश नेतनकर, गोपालकृष्ण यादव, मकरंद कंकाल, धनंजय कोळी, संदीप शेजूळ, नितीन भोसले यांचा समावेश आहे. 03. कोरोना प्रतिबंध, उपचार व रुग्णालयातील खाटांच्या व्यवस्थापनाबाबत २४ तास मनपा मुख्यालयातील हा नियंत्रण कक्ष कार्यरत असेल. सदर कक्ष नागरिक, रुग्णांचे नातवाईक, कुटुंबीय, नातेवाईक यांच्याकरिता शासकीय व खाजगी रुग्णालयात कोरोना उपचारासंबंधी वैद्यकीय खाटांची उपलब्धता व वाटप इतर पूरक सुविधांसंबंधी मदतीकरिता स्थापन करण्यात आला आहे. अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे हे संनियंत्रण अधिकारी म्हणून, तर वैद्यकीय अधिकारी प्रेरणा संकलेचा, डॉ. नीता पाडळकर या समन्वय अधिकारी असतील. 

नागरिकांनी नियम पाळावेतशहरात कोरोना नाही अशा पद्धतीने अनेक नागरिक वावरत आहेत. शहरासाठी ही अत्यंत धोक्याची बाब असून, नागरिकांनी सोशल डिस्टन्स आणि मास्कचा वापर केलाच पाहिजे. या दोन गोष्टी १०० टक्के पाळल्या गेल्या, तर संसर्ग काही प्रमाणात कमी होईल. पूर्वीच्या पद्धतीने रुग्ण शोधणे आणि तपासण्या करणे हे काम महापालिकेकडून नियमितपणे सुरू आहे. रुग्णसंख्येत कमी-जास्त वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. - नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.

रुग्णसंख्येतील                 चढता-उतरता आलेखतारीख     रुग्णसंख्या२७ आॅगस्ट     २६०२८ आॅगस्ट     २७७२९ आॅगस्ट     २४२३० आॅगस्ट    १८४०१ सप्टेंबर     १७८०२ सप्टेंबर     २६६०३ सप्टेंबर     २५१०४ सप्टेंबर     ३३४०५ सप्टेंबर    २२८०७ सप्टेंबर    ३१३०८ सप्टेंबर    २६११० सप्टेंबर    २७०११ सप्टेंबर     २९३१२ सप्टेंबर    २३२ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद