शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

वाशी तालुक्यातील १६६६ ग्राहकांना वर्षभराची सूट

By admin | Updated: January 4, 2016 00:01 IST

वाशी : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील केबल ग्राहकांसाठी ३१ डिसेंबर २०१६ ही अंतीम मुदत आहे़ त्यामुळे आणखी वर्षभर तालुक्यातील १६६६ ग्राहकांना

वाशी : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील केबल ग्राहकांसाठी ३१ डिसेंबर २०१६ ही अंतीम मुदत आहे़ त्यामुळे आणखी वर्षभर तालुक्यातील १६६६ ग्राहकांना ‘सेट टॉप बॉक्स’पासून सुटका मिळणार आहे़ असे असले तरी सध्या केबल चालकांकडून मिळणाऱ्या सेवेतील तांत्रिक त्रुटींमुळे टीव्ही संचावरील चित्र अस्पष्ट दिसत असल्याने अनेक ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे़वाशी शहरात एक केबल चालक असून, डिसेंबर अखेरपर्यंत पर्यंत त्यांच्याकडे ४०० ग्राहक होते़ प्रत्येकी प्रतिमाह १५० रुपये प्रमाणे कर आकारणी केली जात होती़ तहसिलदार सुरेंद्र डोके व त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील केबल ग्राहकांची यादी बनविण्याचे काम हाती घेतले होते़ त्यानंतर संबंधितांकडून शहरातील ६२१ कनेक्शनची यादी महसूल विभागाकडे सूपूर्द करण्यात आली़ शहरातील ग्राहकांना सध्या ३७ चॅनल दाखविण्यात येत आहेत़ या सेवेतही तांत्रिक अडचणी असल्याने ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे़ तक्रारी नोंदविल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात दुरूस्ती करण्यात येते़ मात्र, काही दिवसानंतर सेवा पुन्हा विस्कळीत होत असल्याचे चित्र आहे़ तालुक्यातील तेरखेडा येथे एक केबल चालक असून त्यांच्याकडे सटवाईवाडी, खामकरवाडीसह इतर गा्रमीण भागातील केबजलोडणी असून, ग्राहकांची संख्या ४७३ आहे़ तर पारगाव येथे दोन केबल चालक असून त्यांच्याकडे ३४६ टीव्हीस केबल ग्राहक आहेत़ घाटपिंंपरी येथे १२५ केबल ग्राहक आहेत़ दरम्यान, तालुक्यातील सर्वच केबल ग्राहकांना ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत ‘सेट टॉप बॉक्स’ बसविण्यासाठी मुभा मिळणार आहे़ त्यानंतर मात्र, ग्रामीण भागातील प्रत्येक टीव्ही संचास ‘सेट टॉप बॉक्स’ बसविणे अनिवार्य राहणार आहे़ दरम्यान, ‘सेट टॉप बॉक्स’ बाबत तहसिलदार डोके यांना विचारले असात, तालुक्यातील केबल ग्राहकांनी ‘सेट टॉप बॉक्स’ बसविणे आवश्यक असल्याबाबत अद्याप आदेश आलेले नाहीत़ तुर्तास या सुविधेपासून तालुका तूर्तास वगळला असल्याचेही ते म्हणाले़ तर केबल चालक राजू शिंदे यांनी अद्याप ‘सेट टॉप बॉक्स’ बाबत सूचना नसल्याचे सांगून चालू वर्षात मात्र, ग्राहकांना मुदतीपूर्वीच ‘सेट टॉप बॉक्स’ बसवून घ्यावे लागणार आहेत़