औरंगाबाद : तंत्रशिक्षण विभागाची वेबसाईट मंगळवारी दिवसभर बंद राहिल्यामुळे कॅप राऊंडच्या पहिल्याच दिवशी पॉलिटेक्निकच्या प्रवेशासाठी महाविद्यालये व शाखांना पसंतीक्रम देण्यासाठी ‘एआरसी’वर गेलेल्या विद्यार्थ्यांची मोठी हेळसांड झाली. यासंदर्भात तंत्रशिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील काही पॉलिटेक्निक संस्थांप्रमाणेच मराठवाड्यातील दोन संस्थांनाही प्रवेशप्रक्रियेत सामावून घेण्यात आले. त्यामुळे तंत्रशिक्षण विभागातर्फे आज दिवसभर नवीन सहभागी संस्थांची विद्यार्थी संख्या व शाखांचा ‘डाटाबेस’ अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू होती. या तांत्रिक अडचणींमुळे आज दिवसभर वेबसाईट बंद ठेवण्यात आली होती. परिणामी, आज मंगळवारी पहिला कॅप राऊंड होता आणि पहिल्याच दिवशी दिवसभर वेबसाईट बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना आॅनलाईन महाविद्यालये व शाखांसाठी पसंतीक्रम देता आले नाहीत. रात्री उशिरा वेबसाईट सुरू होईल. त्यानंतर विद्यार्थी स्वत:ही महाविद्यालये व शाखांना आॅनलाईन पसंतीक्रम देऊ शकतील, असेही सूत्रांनी सांगितले.शहरातील ‘एआरसी’वर सायंकाळी ५ वा. वेबसाईट सुरू होईल, त्यानंतर पॉलिटेक्निकच्या संस्था व शाखांसाठी पसंतीक्रम देता येईल, असे सांगण्यात आले. सायंकाळनंतर पुन्हा विद्यार्थी ‘एआरसी’वर गेले. तेव्हाही वेबसाईट अद्याप उघडत नसल्याचे कारण सांगण्यात येत होते. त्यामुळे दिवसभर विद्यार्थ्यांची मोठी हेळसांडझाली.तीन फेऱ्या होणारमराठवाड्यात पॉलिटेक्निकच्या आता ७६ संस्था झाल्या असून, त्यामध्ये १० शासकीय, तर ६६ खाजगी संस्थांचा समावेश राहील. या संस्थांमधील २७ हजार जागांवर प्रवेश देण्यासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप राऊंड) तीन फेऱ्या होणार आहेत. त्यानुसार आज मंगळवारी पहिल्या कॅप राऊंडची सुरुवात होती; पण पहिल्याच दिवशी दिवसभर वेबसाईट बंदच होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी पंचाईत झाली.
दिवसभर वेबसाईट बंद; विद्यार्थ्यांची गैरसोय
By admin | Updated: July 23, 2014 00:40 IST