शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेट घाला, नाही तर ऑफिसमध्ये ‘नो एंट्री’ !

By संतोष हिरेमठ | Updated: June 10, 2023 19:49 IST

शासकीय, निमशासकीय कार्यालये, महाविद्यालयांमध्येही लवकरच अंमलबजावणी

छत्रपती संभाजीनगर : आरटीओ कार्यालयात आता हेल्मेट परिधान केलेल्याच दुचाकीचालकांना प्रवेश दिला जात आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालये, वरिष्ठ महाविद्यालयांमध्येही लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी दिली.

आरटीओ कार्यालयात गुरुवारी हेल्मेट नसलेल्या दुचाकीधारकांना प्रवेश नाकारण्यात येत होता. ‘हेल्मेट नसेल तर प्रवेश नाही’ असे फलक प्रवेशद्वारावर लावण्यात आले आहे. आरटीओ कार्यालयापाठोपाठ अन्य शासकीय कार्यालयांतही याची अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच ३० पेक्षा अधिक आस्थापना असणाऱ्या कार्यालये, कंपन्यांमध्येही याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात आरटीओ कार्यालयाकडून प्रत्येकाला सूचना वजा नोटीस दिली जात आहे.

कामगारांची सुरक्षा महत्त्वाचीवाळूज, शेंद्रा परिसरातील कंपन्यांतील कामगारांच्या सुरक्षेसाठी कंपन्यांनीही कंपनीत प्रवेश करताना हेल्मेट सक्ती करणे आवश्यक आहे. अपघातातील अनेक दुचाकीस्वार हे कंपन्यांतील कामगार असल्याचे समोर येते, असे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे म्हणाले.

नंतर कारवाईचा बडगाया निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. या मुदतीनंतर आरटीओ कार्यालयाच्या पथकाकडून कार्यालयात हेल्मेटशिवाय प्रवेश करणाऱ्या दुचाकीचालकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबाद