शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही डॉक्टर, सैनिक नाही; घाटीत बाऊंसर नियुक्त करण्याची निवासी डॉक्टरांची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 12:11 IST

घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धक्काबुक्कीच्या घटनेनंतर निवासी डॉक्टरांनी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानावर अविश्वास दर्शवित बाऊंसर नियुक्त करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देघाटीत १२ नोव्हेंबर रोजी मेडिसिन विभागात उपचार सुरू असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाणीची घटना होती पाच महिन्यांत बुधवारी रात्री दुसरी घटना घडली.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धक्काबुक्कीच्या घटनेनंतर निवासी डॉक्टरांनी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानावर अविश्वास दर्शवित बाऊंसर नियुक्त करण्याची मागणी केली.

घाटीत १२ नोव्हेंबर रोजी मेडिसिन विभागात उपचार सुरू असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाणीची घटना घडली होती. पाच महिन्यांत बुधवारी रात्री दुसरी घटना घडली. या घटनेनंतर सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करीत डॉक्टरांनी आंदोलन पुकारले. बुधवारी रात्रीपासून गुरुवारी दिवसभरात निवासी डॉक्टरांच्या जवळपास वीस बैठका झाल्या. अधिष्ठातांच्या कक्षात आयोजित बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांसमोर अनेक धक्कादायक बाबी निवासी डॉक्टरांनी उघड केल्या. पोलिसांत तक्रार दिल्यास जीवितास धोका वाटतो. त्यामुळे यावेळी तक्रार दिली जाणार नाही. प्रशासनाने कारवाई करण्याची भूमिका डॉक्टरांनी घेतली. 

धक्काबुक्की होत असताना महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे त्यांच्या प्रमुखांची बदली करण्यात यावी, बाऊंसर नियुक्त करावे, अशी मागणी केली. डॉक्टरांवर हल्ले होत असताना आता एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहिली जात आहे, असा संतप्त सवालही उपस्थित करण्यात आला.

आम्ही डॉक्टर, सैनिक नाहीनोव्हेंबरमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतरही काहीही सुधारणा झालेली नाही. आम्ही डॉक्टर आहोत, सैनिक नाही. त्यामुळे नातेवाईकांकडून धोका वाटला तर यापुढे पळून जाऊ. आंदोलन केल्याने वरिष्ठ डॉक्टर तंबी देत आहेत, असेही निवासी डॉक्टर म्हणाले.

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलmedicineऔषधं