शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

'गोडीने सांगत आहोत,अन्यथा गुन्हे दाखल करू';विभागीय आयुक्तांचा खाजगी रुग्णालयांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 17:45 IST

रुग्ण दाखल करून न घेणाऱ्या खाजगी रुग्णालयांना विभागीय आयुक्तांचा इशारा

औरंगाबाद : खाजगी हॉस्पिटल्सबाबत दोन तक्रारी आल्या आहेत. प्रशासकीय यंत्रणा सध्या गोडीने सांगत आहे, जर ऐकले नाही, तर गुन्हे दाखल करु, असा इशारा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. लवकरच खाजगी हॉस्पिटल्स व्यवस्थापन प्रतिनिधींची बैठक घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

केंद्रेकर म्हणाले की, खाजगी हॉस्पिटल्ससंबंधी आलेल्या तक्रारीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितले आहे. व्हेंटिलेटर नाही म्हणून रुग्णाला दाखलच करून घ्यायचे नाही, हा चालूपणा खाजगी हॉस्पिटल्सनी करू नये. याबाबत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी एक सिस्टीम उभी केली आहे. जर एखाद्या कोरोनाच्या रुग्णाची दमछाक होत असेल व त्या रुग्णाला हॉस्पिटल्समध्ये व्हेंटिलेटर नसेल, तर त्याला आॅक्सिजन देऊन दाखल करून घ्या. त्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेला कळवा. त्यानंतर प्रशासन त्याबाबत निर्णय घेईल. 

रुग्ण दाखल करून घ्यावेच लागतीलखाजगी हॉस्पिटल्सना रुग्ण दाखल करून घ्यावेच लागतील. व्हेंटिलेटर असो किंवा नसो, आॅक्सिजनची व्यवस्था तर असतेच ना; परंतु काही ठिकाणी मुद्दामहून रुग्ण दाखल करून घेण्याबाबत टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी येत असून, येत्या आठवड्यात खाजगी हॉस्पिटल्स आणि प्रशासनाची बैठक होणार आहे. त्या बैठकीत विभागीय आयुक्त केंद्रेकर रुग्ण दाखल करून घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना करणार आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटल