सितम सोनवणे , लातूरस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर जिल्ह्यात बीसीएची १५२ महाविद्यालये होती़ परंतू, तसेच विद्यापीठांच्या नियम, निकषांचे पाल न केल्यामुळे ९३ महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया बंद केल्याने ती बंद झाली आहे़ आजमितीला या चारही जिल्ह्यात केवळ ५९ महाविद्यालये सुरू असून, त्यातीलही काही महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत़ मेक इन इंडिया, डिजिटीलायझेशन, माहिती तंत्रज्ञानाचा काळ म्हणून २००० सालापासून संगणक प्रशिक्षित व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या़ शासनानेही एमएससीआयटी प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना अनिवार्य केले़ या सर्व घटनांचे अवलोकन करणाऱ्यांनी संगणक क्षेत्रातील संधी पाहून बीसीए महाविद्यालय मोठ्या प्रमाणात सुरू झाली़ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत नांदेड जिल्ह्यात ४३, परभणी व हिंगोलीमध्ये ५५ तर एकट्या लातुरात ५४ महाविद्यालये सुरू झाली़ त्यातील सुरूवातीच्या काळातील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधीही उपलब्ध झाल्या़ पण २००८-२००९ पासून अचानकपणे संगणतज्ज्ञांची मागणी घटली़ त्याचा परिणाम प्रथमत: संगणक क्षेत्रातील नोकऱ्यांना बसला़ महाविद्यालयातून पास होऊन डिग्री घेऊन् हजारो विद्यार्थी बाहेर पडले़ पण संगणकाचे प्रात्यक्षिक ज्ञान मात्र शून्य राहिल्याने अशा पास झालेल्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत नसल्याची ओरड सुरू झाली़ त्यांना रोजगार मिळेना़ गल्ली बोळात निघालेल्या महाविद्यालयांमुळे शैक्षणिक गुणवत्ता ढासाळली़ परिणामी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली़ परिणामी काही महाविद्यालयांना पुन्हा घरघर लागली़ डीटीएड्, बीएड् प्रमाणेच विद्यार्थ्यांनी बीसीए महाविद्यालयाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली़
महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर
By admin | Updated: July 18, 2016 01:06 IST