शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बोर दहेगावात सहा महिन्यांपासून पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:26 IST

वैजापुरात मोर्चा : सरपंच, ग्रामसेवक हजर नसल्याने ग्रामस्थ पंचायत समितीत धडकले

वैजापूर : तालुक्यातील बोर दहेगाव येथे मागील सहा महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. मागासवर्गीय वस्ती व गावातील काही लोकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी निष्क्रिय ग्रामपंचायतीच्या विरोधात मंगळवारी मोर्चा काढला.ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच व ग्रामसेवक उपस्थित नव्हते. ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप होते. मागील सहा महिन्यांपासून गावात पाणी नाही, पण खाजगी वॉटर फिल्टरला पाणी कसे, बोअरवेलचे पाणी विक्रीसाठी आहे, पण गावातील लोकांना नाही. त्यामुळे फिल्टरला जाणारे पाणी त्वरित बंद करून ते पाणी गावात सोडावे व खाजगी फिल्टरचे पाणी विक्री करून पैसे कमावण्याचा गोरखधंदा बंद करण्यात येऊन गावाला सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी या गावातील मोर्चेकरी तरुण व महिलांनी केली.तक्रार करुनही दखल नाहीशोभा उगले, कडूबाई त्रिभुवन, अंबिका वाघ, भाऊसाहेब शेलार, नानासाहेव उगले, सुनील उगले, राजू त्रिभुवन आदींसह ६० लोकांनी गटविकास अधिकारी वैजापूर अजयसिंग पवार यांच्याकडे लेखी तक्रार दिलेली होती. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे गावातील तरुणांनी व महिलांनी एकत्र येऊन ग्रामसेवक व सरपंच यांच्या विरोधात आक्रमक होऊन पंचायत समिती कार्यालयावर पाण्यासाठी मोर्चा काढला. यावेळी अमोल शेलार, प्रवीण त्रिभुवन, संतोष शेलार, राहुल शिंदे, पावन शिनगारे, राहुल शेलार, सोमनाथ शेलार, राजू शेलार, रामचंद्र शेलार, गौतम त्रिभुवन, विशाल शेलार, रामनाथ शेलार, अशोक शिनगारे, संदीप शिंदे, रवी शिंदे, भगवान शेलार मोर्चात सहभागी झाले होते.

टॅग्स :Morchaमोर्चाWaterपाणी