टेंभापुरी मध्यम प्रकल्पाचा तालुक्यातील २३ गावांमधील ४७८४ हेक्टर क्षेत्राला फायदा होतो. मात्र, मागील दहा वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे धरणात पाणीच आले नव्हते. यामुळे लाभक्षेत्रातील गावांना दुष्काळाचा सामना करावा लागला होता. २१.२७ दशलक्ष घनमीटर पाण्याची क्षमता असलेला हा मध्यम प्रकल्प यंदा शंभर टक्के भरल्याने शेतकऱ्यांनी पाणी सुटेल, या भरवशावर उन्हाळी पिकांची लागवड केलेली आहे. यावर्षी मार्चमध्येच उन्हाची तीव्रता वाढली असल्याने शेतकऱ्यांना उन्हाळी कांदा, कलिंगड, खरबूज आदी पिकांसाठी पाण्याची आवश्यकता होती. यामुळे त्यांनी आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. ही मागणी लक्षात घेऊन पोटचाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली असून गुरुवारी उन्हाळी आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे प्रकल्प अभियंता राजेंद्र खापर्डे यांनी सांगितले.
चौकट
तीन दिवस सुरू राहणार आवर्तन
टेंभापुरी प्रकल्पातून सोडले जाणारे आवर्तन हे ८ ते ११ एप्रिलदरम्यान सुरू राहणार आहे. सुरुवातीला ५० क्यूसेसने विसर्ग होणार असून नंतर पाण्याचा वेग वाढविला जाणार आहे. तब्बल दहा वर्षांनंतर पाणी सुटणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
फोटो : दहा वर्षांनंतर यंदा प्रथमच भरलेले टेंभापुरी धरण.
070421\jayesh nirpal_img-20210407-wa0059_1.jpg
दहा वर्षांनंतर यंदा प्रथमच भरलेले टेंभापूरी धरण.