शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

पावसाळ्यातही पाच गावांना टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:19 IST

खुलताबाद तालुक्यात भर पावसाळ्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली असून पाऊस गायब झाल्याने गावागावात पाणीटंचाई निर्माण होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखुलताबाद तालुक्यात भर पावसाळ्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली असून पाऊस गायब झाल्याने गावागावात पाणीटंचाई निर्माण होत आहे. तालुक्यातील पाच गावांना टँकरने तर सहा गावांना विहीर अधिग्रहण करून प्रशासनाने शुक्रवारपासून पाणीपुरवठा सुरू केला आहे. पाऊस नसल्याने पिके करपली आहेत. सर्वच जण पावसासाठी देवाला साकडे घालत आहे. तालुक्यात आतापर्यंत फक्त २२.६० टक्केच पाऊस पडला आहे.खुलताबाद तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस जोरदार झाला होता. त्यानंतर पाऊस जो गायब झाला तो परत आलाच नाही. मध्यंतरी रिमझिम पावसाने पिके कशीबशी तग धरून उभी होती. परंतु गेल्या २५ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने पिके करपू लागली आहेत. जमिनीतील पाणीसाठा खोलवर गेल्याने गावागावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याचे टँकर सुरू करावे, म्हणून ग्रामपंचायतीने तालुका पंचायत समिती कार्यालयास पाणीटंचाईचे प्रस्तावही दाखल केले; परंतु ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ या युक्तीप्रमाणे कागदी घोडे मिरविण्याचे काम सुरू आहे. पाणीटंचाईची ओरड लक्षात घेता तालुका प्रशासनाने शुक्रवारपासून गदाना, बोरवाडी, भडजी, ममनापूर, विरमगाव या पाच गावांना शासकीय पाण्याचे टँकर सुरू केले आहेत तर टाकळी राजेराय गावास ३ विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्याचबरोबर बोरडमई , पळसगाव, लामणगाव, सराई येथे विहिर अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील खिर्डी, मावसाळा गावातही पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामपंचायत सोमवारी टँकरसाठी पंचायत समिती कार्यालयास प्रस्ताव दाखल करणार आहे. अशीच काही परिस्थिती तालुक्यातील इतर गावात निर्माण झाली असल्याने मुसळधार पाऊस न पडल्यास भरपावसाळ्यात टँकरची संख्या आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.तालुक्यात १३ आॅगस्टअखेर फक्त १७८ मि.मी. इतकाच म्हणजे २२.६० टक्केच पाऊस झाला असून तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ७९९.५० इतकी असून गेल्यावर्षी आतापर्यंत ४०३ मि.मी पाऊस झाला होता. पंरतु यंदा पावसाने उघडीप दिल्याने पिकांनी माना टाकण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे खरीप हंगाम पूर्णत: वाया जाणार असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात निराशेचे वातावरण दिसू लागले आहे.