शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

२०० प्रकल्पांमध्ये साडेबारा टक्के पाणीसाठा

By admin | Updated: May 20, 2017 23:35 IST

उस्मानाबाद :जिल्ह्यातील १९ प्रकल्प कोरडेठाक पडले असून, उर्वरित २०० प्रकल्पांमध्ये १२़६८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यातील १९ प्रकल्प कोरडेठाक पडले असून, उर्वरित २०० प्रकल्पांमध्ये १२़६८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे़ तर ७३ प्रकल्पांची पाणीपातळी ही जोत्याखाली गेली आहे़ तर ९८ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांहूनही कमी पाणी उपलब्ध आहे़मागील तीन ते चार वर्षे अल्प पर्जन्यमान झाल्याने भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना जिल्हावासियांना करावा लागला आहे़ टंचाई निवारणार्थ उपायोजना करताना प्रशासनाच्या नाकी नऊ आले होते़ गतवर्षी सप्टेंबरच्या अखेरीस परतीचा पाऊस दिलासादायक झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश सर्वच प्रकल्प तुडूंब भरले होते़ शिवाय जलयुक्तमधील नदी खोलीकरणातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला होता़ विशेष म्हणजे अनेक प्रकल्पांमधील गाळाचा उपसा केल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला होता़ सप्टेंबर २०१६ नंतरच्या आठ महिन्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा झाल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यातील २०० प्रकल्पांमध्ये केवळ १२़६७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़ तर १९ प्रकल्प हे कोरडेठाक पडले आहेत़ ९८ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांहून कमी प्रमाणात पाणी शिल्लक आहे़ तर २५ प्रकल्पात २६ ते ५० टक्क्यांच्या दरम्यान पाणी आहे़ केवळ ४ प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांच्या मध्ये पाणी उपलब्ध आहे़ जिल्ह्यातील २१९ प्रकल्पांपैकी १९ प्रकल्प कोरडेठाक आहेत़ उर्वरित प्रकल्पांमध्ये ६७६़७२७ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे़ उपयुक्त पाण्याची टक्केवारी १२़६८ टक्के आहे़ मागील आठवड्यात १३़३१ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता़ एका आठवड्यात प्रकल्पांमधील ०.६३ टक्के पाण्याचा झाला. मागील वर्षी याच कालावधीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ ०.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता़ गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाण्याचा साठा मुबलक असला तरी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे़