शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पुनर्वसित नानसी गावात पाणीटंचाईचा बळी

By admin | Updated: September 25, 2014 00:53 IST

मंठा : निम्नदुधना प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील नानसी गावाचे स्थलांतर झाले खरे. परंतु त्या ठिकाणी पाणीटंचाई असल्याने गावालगत हेलस शिवारात विहिरीवर पाणी

मंठा : निम्नदुधना प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील नानसी गावाचे स्थलांतर झाले खरे. परंतु त्या ठिकाणी पाणीटंचाई असल्याने गावालगत हेलस शिवारात विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना २३ सप्टेंबर रोजी घडली. बळीराम लक्ष्मण चव्हाण (वय ३५) असे या मृत तरूणाचे नाव आहे. याबाबत मंठा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. पुनर्वसित नानसी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने निकाली काढावा, अशी मागणी होऊन देखील प्रशासकीय पातळीवर त्याकडे दुर्लक्ष झाले. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडून अंतर्गत जलवाहिनीचे काम करण्यात आले. परंतु निम्न दुधना प्रकल्प कार्यालयाकडून गावात पाणीपुरवठा करण्यासाठी विहिर व विहिर ते गाव जलवाहिनी, जलकुंभ मंजूर नसल्याचे ग्रामस्थ ंबंडूनाना निर्वळ यांनी सांगितले. निम्न दुधनाचे पाणी अडविण्यासाठी गावकऱ्यांचे तात्काळ स्थलांतर करण्यात आले. परंतु कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आलेली नाही. ऐन सणासुदीच्या काळात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.