शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

नळ दुरुस्तीतून पाणी बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2016 00:08 IST

औरंगाबाद : एकीकडे ग्रामीण भागात पाण्यासाठी लोकांना कोसो मैल पायपीट करावी लागत आहे, तर दुसरीकडे शहरात नळांच्या तोट्या खराब असल्याने शेकडो लिटर पाणी वाया जात आहे.

औरंगाबाद : एकीकडे ग्रामीण भागात पाण्यासाठी लोकांना कोसो मैल पायपीट करावी लागत आहे, तर दुसरीकडे शहरात नळांच्या तोट्या खराब असल्याने शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे मोल काय असते, हे ज्यांच्यावर पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ आली; तेच सांगू शकतील. तोटीचे ओटे खराब झाल्याने रस्त्यावर शेकडो लिटर पाणी वाहून जात असतानाही त्या नळमालकाच्या ‘हृदयाला’ पाझर फुटत नसल्याने अखेर आता जलसाक्षरतेसाठी जलमित्र समोर आले आहेत. ज्यांच्याकडील नळाची तोटी खराब असेल, पाईपमधून पाणी गळत असेल, अशा नागरिकांनी जर या जलमित्रांना फोन केला तर हे जलमित्र येऊन कोणतेही शुल्क न घेता ते दुरुस्त करून देत आहेत. दुष्काळ भूतकाळ ठरावा, शहरवासीयांनी पुढाकार घेऊन पाणी बचतीला स्वत:पासून सुरुवात करावी, हा आदर्शवाद कागदावर व व्हॉटस् अ‍ॅपवरच दिसून येतो. प्रत्यक्षात ज्या दिवशी त्या भागात नळाला पाणी येते तिथे फेरफटका मारला असता रस्तोरस्ती शेकडो लिटर पाणी वाया गेल्याचे दिसून येते. याचे कारण म्हणजे अनेक घरांसमोरील नळांना तोट्याच नाही. काही ठिकाणी तोट्यांचे ओटे खराब झाल्याने पाण्याची गळती होते. मोटारपंपाचे पाईप चिरल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते. छोट्या कामासाठी प्लंबर मिळत नाहीत, ही ओरडही होत असते. शेकडो लिटर पाणी वाया जाऊ नये, यासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात मनसेचे शहर अध्यक्ष सुमित खांबेकर यांनी आवाहन केले आहे की, नळाची तोटी खराब आहे, तिची दुरुस्ती होत नसल्याने शेकडो लिटर पाणी वाहून जात आहे. दुरुस्तीअभावी जर पाणी वाया जात असेल तर हे दुर्दैव आहे. यासाठी आम्ही प्लंबरचे पथक तयार केले आहे.नादुरुस्त नळातील पाणी गळती थांबविण्यासाठी घरमालकांनी सकाळी ९ ते ११ वाजेदरम्यान आपली नावनोंदणी औरंगपुरा येथील नाथ मंदिराशेजारी असलेल्या ‘राधामोहन-चविष्ट’ येथे करावी. तसेच ९७६४७७३७७७ या नंबरवर संपर्क साधावा. घरमालकांनी साहित्य विकत आणावे. तोटी बसविणे व दुरुस्तीचे काम विनामूल्य करण्यात येईल. प्लंबिंग असोसिएशन तयार करणार शोषखड्डे प्लंबिंग वेलफेअर असोसिएशनतर्फे ज्या कॉलनीत मोकळ्या जागेत किंवा कोपऱ्यात पावसाचे पाणी साठत असेल, तेथे शोषखड्डे तयार करण्यात येणार आहेत. जेणेकरून पावसाचे पाणी वाया न जाता ते जमिनीमध्ये मुरेल. तसेच संघटनेतर्फे रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी जनजागृती केली जात आहे.यासाठी ४२ जणांचे पथक तयार करण्यात आले आहे. यासंदर्भात सचिव बाळासाहेब भोसले यांनी सांगितले की, रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे १ हजार स्क्वेअर फूट प्लॉटवर २० हजार लिटर पाणी आपण वाचवू शकतो. ही जनजागृती करीत असतानाच आमचे सदस्य ज्या नळांना तोट्या नाही, तेथे त्या मालकाने तोट्या दिल्यास त्या बसवून देण्याचे काम विनामूल्य करण्यात येईल. यासाठी अध्यक्ष ज्ञानेश्वर खरात, श्रीरंग फरकाडे, आशुतोष मलिक, वाजिद सिराज, शिवाजी जवरे, गणेश जाधव, बबन खरात, गंगाधर राजने, संतोष कुमावत, देवानंद खरात, संतोष म्हस्के, नरसिंग भारती, किरण नवतुरे, प्रकाश हेकाडे, चंद्रशेखर कुबेर आदी परिश्रम घेत आहेत. पाण्याचा काटकसरीने वापर करून त्याची बचत करणे सध्याच्या परिस्थितीत नितांत गरज आहे. पाणी बचतीबाबत जनजागृती करण्यासाठी ‘लोकमत’ने ‘जलमित्र अभियान’ सुरू केले आहे. पाणी बचतीसाठी तुम्ही नवनवीन कल्पना राबवीत असाल, तर आपले अनुभव आम्हाला ९८८१३००४९४, ९८८११९७३९८ या क्रमांकावर कळवावेत.