लातूर : सार्वजनिक गुढी महोत्सव समिती लातूरच्या वतीने गंजगोलाई येथील श्री जय जगदंबा मंदिरासमोर सनई, चौघड्यांच्या सुरात सार्वजनिक गुढी उभारण्यात आली होती. यावेळी ‘पाणी बचती’चा संदेश देण्यात आला. गंजगोलाई परिसरात मिरवणूक काढून व विधिवत पूजा करून महोत्सव समितीच्या वतीने महादेव पवार, प्रदीपसिंह गंगणे यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. यावेळी रामेश्वर भराडिया, वीरभद्र वाले, अमर गायकवाड, चंदू बगडे, नीलेश पवार, दत्ता चेवले, समद शेख, काकासाहेब घुटे, शिरीष तुळजापुरे, रामभाऊ जवळगे आदींची उपस्थिती होती. लातूर शहरासह जिल्हाभरात गुढी उभारण्यात आली होती. गुढी पाडव्यानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. (प्रतिनिधी)
सार्वजनिक गुढी उभारून पाणी बचतीचा संदेश
By admin | Updated: March 28, 2017 23:34 IST