नांदेड :जिल्ह्यात १६ ते २२ मार्च दरम्यान जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहातंर्गत २० मार्च रोजी नांदेड शहरात वॉटर रन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. नांदेड पाटबंधारे मंडळाच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ६:३० वाजता आयटीआय चौक-महात्मा ज्योतिबा पुतळा परिसरातून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालय येथे समारोप होईल.
जलजागृतीसाठी वॉटर रन स्पर्धा
By admin | Updated: March 19, 2016 20:21 IST