शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदा विभाग सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर

By admin | Updated: September 12, 2016 23:22 IST

औरंगाबाद : राज्यात जलसंपदा खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची ४० टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त झाली आहेत. शिवाय येत्या चार वर्षांत आणखी पाच हजार अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत.

औरंगाबाद : राज्यात जलसंपदा खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची ४० टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त झाली आहेत. शिवाय येत्या चार वर्षांत आणखी पाच हजार अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढतो आहे. दुसरीकडे शासनाकडून रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. आकृतिबंधानुसार राज्यभरात जलसंपदा विभागांतर्गत एकूण ४५ हजार पदे मंजूर आहेत. यामध्ये शिपाई, कारकून, कालवा निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता यासह सर्वच पदांचा समावेश आहे. सध्या यातील २८ हजार अधिकारी, कर्मचारीच कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षांपासून जलसंपदा खात्यातील अधिकारी, कर्मचारी खूप मोठ्या संख्येने सेवानिवृत्त होत आहेत. परिणामी एकेका अधिकाऱ्यांकडे दोन दोन पदांचा पदभार सोपविण्यात आलेला आहे. शिवाय कनिष्ठ कर्मचाऱ्यांनाही कामाचा ताण सहन करावा लागत आहे. मेअखेरीस एकाच महिन्यात जलसंपदा विभागातील तब्बल १२०० कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. याशिवाय चालू महिन्यात म्हणजे सप्टेंबरअखेरीसही १६१ अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. सध्या कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. येत्या चार वर्षांत खात्यातील तब्बल पाच हजार अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होणार असल्याचे जलसंपदा खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.एकट्या औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) कार्यालयांतर्गत २३९२ पदांपैकी तब्बल १३१४ पदे रिक्त आहेत. कडा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात औरंगाबाद, जालना आणि परभणी हे तीन जिल्हे येतात. रिक्त पदांपैकी बहुसंख्य पदे ही सिंचन व्यवस्थापनाशी निगडित आहेत. त्यामुळे सिंचन व्यवस्थापनाच्या कामावर त्याचा विपरीत परिणाम होतो आहे. कालवा निरीक्षकाच्या ६०० मंजूर पदांपैकी सध्या केवळ १५२ कालवा निरीक्षकच कार्यरत आहेत. उर्वरित ४४८ पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे दप्तर कारकुनाच्या १९५ पदांपैकी १०३ पदे रिक्त आहेत. मोजणीदाराच्या ३०० पदांपैकी १९५ पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे इतर संवर्गातीलही असंख्य पदे रिक्त आहेत. शिवाय प्रत्येक महिन्यात अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सेवानिवृत्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर सिंचन कर्मचारी संघटनेने काही दिवसांपूर्वीच रिक्त पदे भरण्याची मागणी केली आहे.