माजलगाव : नळाचे पाणी भरण्यावरून राजेगाव येथे रविवारी तुंबळ हाणामारी झाली. यात लाठ्याकाठ्या, तलवारीसारख्या शस्त्राचा वापर झाला. चौघे जखमी आहेत.सुदाम साळवे, पत्नी वेणुबाई, मुलगा अमर, अजय यांचा जखमींत समावेश आहे. श्रीधर साळवे, राजेश साळवे, विजय साळवे, मिलिंद साळवे, दिनेश साळवे, प्रल्हाद साळवे, रवि साळवे , महेश साळवे, सुमन साळवे, रजनी साळवे यांच्याविरूद्ध ग्रामीण ठाण्यात तक्रार आहे. (वार्ताहर)
राजेगावात पाणी पेटले; सशस्त्र हल्ल्यात चौघे गंभीर
By admin | Updated: March 30, 2015 00:43 IST