शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

पाणी योजनेचे अंदाजपत्रक मंजूर

By admin | Updated: December 23, 2015 23:47 IST

उस्मानाबाद : तालुक्यातील चव्हाणवाडी येथील पुनर्सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेस २२ डिसेंबर रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली असून,

उस्मानाबाद : तालुक्यातील चव्हाणवाडी येथील पुनर्सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेस २२ डिसेंबर रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली असून, यामुळे गावचा पाणीप्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. विशेष म्हणजे या योजनेसाठी दुसऱ्यांदा ही रक्कम वाढवून देण्यात आली आहे.चव्हाणवाडी पाणी पुरवठा योजनेसाठी पूर्वी ८ लाख दहा हजार रुपये ढोबळ खर्चाच्या अंदाजपत्रकास जुलै २००७ च्या शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. परंतु, काही कारणांमुळे योजनेच्या खर्चात वाढ झाल्याने सन २००७ मध्ये २३.४७ लक्ष रुपये एवढ्या सुधारित किंमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर दरसुचितील फरक, जादा दराची निविदा स्वीकारणे तसेच काही उपांगाच्या खर्चात वाढ झाल्याने सदर योजना ४५.२९ लक्ष एवढी पुनर्सुधारित करावी लागली. पुनर्सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याच्या हेतूने स्थापन करण्यात आलेल्या वित्त विभाग, नियोजन विभाग व पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागातील तसेच क्षेत्रिय स्तरावरील महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या अधिकाऱ्यांच्या छोट्या गटाने २० जून २०१४ रोजीच्या बैठकीत सदर योजनेस पुनर्सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची शिफारस करण्यात आली होती. त्याअनुषंगाने शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्यानंतर ४५ लाख २९ हजार रुपये किंमतीच्या या पुनर्सुधारित अंदाजपत्रकास २२ डिसेंबर रोजी मान्यता देण्यात आली.