शहरं
Join us  
Trending Stories
1
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
2
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
3
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
4
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
5
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
6
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुब्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
7
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
8
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
9
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
10
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
11
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
12
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
13
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
14
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
15
उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
16
China Japan Tensions: जपान आणि चीनमध्ये तणाव वाढला, पंतप्रधानांचं विधान का ठरलं वादाचं कारण?
17
भूकंपासह अनेक मोठी संकट येणार, ज्वालामुखीचा उद्रेक, तीव्र हवामान बदल; बाबा वेंगाची २०२६ साठी भविष्यवाणी
18
बाजारात नफावसुलीचा जोर! एअरटेल-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये जोरदार घसरण; सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
19
बाल्कनीतून डोकावताना तोल गेला, तीन वर्षांचा चिमुकला खाली पडला...; नाशिकमधील घटना
20
भारताने रचण्यास सुरुवात केली 'इंद्रजाल'; पाकिस्तानने मग तुर्कीचा ड्रोन पाठवूदे नाहीतर चीनचा...
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीतून १२ तास पाण्याचा उपसा बंद

By admin | Updated: July 15, 2017 00:54 IST

औरंगाबाद : वीज वितरण कंपनीने शुक्रवारी दुरुस्तीसाठी जायकवाडी येथील वीजपुरवठा सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद ठेवला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वीज वितरण कंपनीने शुक्रवारी दुरुस्तीसाठी जायकवाडी येथील वीजपुरवठा सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद ठेवला. त्यामुळे महापालिकेला दोन्ही पाणीपुरवठा योजना बंद ठेवाव्या लागल्या. रात्री उशिरा वीजपुरवठा सुरळीत झाल्यावर पाणी आणण्याचे काम सुरू झाले. शहरात सकाळी ६ वाजेपासून पाणी येण्यास सुरुवात होईल. शनिवारी ज्या वसाहतींना पाणीपुरवठा करायचा होता त्यांना पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे.चार दिवसांपूर्वीच वीज वितरण कंपनीने मनपाला शुक्रवारी १२ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार असल्याचे कळविले होते. नियोजित वेळेनुसार शुक्रवारी सकाळी ९ वाजता वीज कंपनीने जायकवाडी पंप हाऊस येथील वीजपुरवठा खंडित केला. दरम्यान, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मुख्य जलवाहिनीवरील दहा गळत्यांची रिपेअरिंग केली. रात्री नऊनंतर वीजपुरवठा सुरू झाल्यावर मनपाने एकानंतर एक पाण्याचे पंप सुरू केले. शहरात पाणी आणण्यासाठी ६ ते ८ तासांचा अवधी लागतो. सकाळी ६ वाजता शहरातील प्रमुख टाक्यांवर पाणी येण्यास सुरुवात होईल. दिवसभर मुख्य पाण्याच्या टाक्या भरून घेणे, त्यानंतर इतर लहान टाक्या भरून घेण्यात येतील. शुक्रवारी अनेक वसाहतींना निर्जळीचा सामना करावा लागला. या वसाहतींना आता शनिवारी पाणी देण्याचे नियोजन मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी दिली.पाण्याची जायकवाडीकडे झेपपैठण : नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस पडत असून तेथील धरणात ५० टक्यांपेक्षा जास्त जलसाठा झाल्याने नांदूर मधमेश्वर वेअरमधून गोदावरीच्या पात्रात २२३०० क्युसेक्स क्षमतेने विसर्ग करण्यात येत आहे. गोदावरी दुथडी भरून वाहती झाली असून या पाण्याने जायकवाडीकडे आगेकूच केली आहे. शनिवारी दुपारनंतर हे पाणी जायकवाडीत येऊन धडकण्याची शक्यता धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. पावसाचा दीड महिना लोटल्यानंतरही जायकवाडीत आवक नसल्याने मराठवाड्यात काळजीचे वातावरण पसरले होते.