शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
3
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
4
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
5
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
6
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
7
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
8
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
9
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
10
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
11
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
12
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
13
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
14
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
15
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
16
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
17
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
18
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
19
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
20
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स

कंधारला ‘लिंबोटी’तून पाणी

By admin | Updated: August 10, 2014 02:23 IST

कंधार : शहाराचा पाणी प्रश्न पाणी स्त्रोताअभावी ऐरणीवर आला होता. राज्यशासनाच्या सुजल व निर्मल अभियानांतर्गत पा.पु. योजनेला २५ कोटी ६७ लाखाची

कंधार : शहाराचा पाणी प्रश्न पाणी स्त्रोताअभावी ऐरणीवर आला होता. राज्यशासनाच्या सुजल व निर्मल अभियानांतर्गत पा.पु. योजनेला २५ कोटी ६७ लाखाची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाली. ८ आॅगस्ट रोजी न.प. विशेष सभेत सर्वानुमते कामाची निविदा मंजुरीचा ठराव पारीत करण्यात आला. लिंबोटी धरणातून पाणी आणून शहराची कायमची पाणी टंचाई दूर होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे. शहराची तहान मानार नदी व जगतुंग समुद्रातील पाणी स्त्रोतावर अवलंबून आहे. पर्जन्यमानाचा सततचा लहरीपणा, मानार नदी व जगतुंग समुद्रातील घटत असलेला जलस्त्रोत आदीमुळे शहरावर सतत पाणी टंचाईचे ढग असतात. यासाठी न.प.ने महाराष्ट्र शासनाच्या सुजल व निर्मल अभियानांतर्गत पा.पु. योजनेचा सुमारे ३६ कोटीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. प्रस्तावात दरडोई १३५ लिटरचा समावेश होता. परंतु शासनाने प्रतिदिन प्रति मनुष्य ७० लिटर प्रमाणे २५ कोटी ६७ लाखाची पा.पु. योजनेला मार्च २०१४ ला प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळाली. तरीही निविदा मान्य करणे, पाणी पुरवठा करुन पाणी प्रश्न निकाली काढताना मात्र न.प. मधील गटा-तटाचे राजकारण अडसर ठरते की काय? अशी भिती नागरिकातून व्यक्त केली जात होती.८ आॅगस्ट रोजी विशेष सभा नगराध्यक्षा शोभाताई नळगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यात सर्वानुमते निविदा मान्य करण्याचा ठराव पारीत करण्यात आला. नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व तिर १४ अशा १६ जणांनी यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. लिंबोटी धरणाच्या (अप्पर मानार प्रकल्प) बुडीत क्षेत्रातून अशुद्ध पाणी उपसा करुन २५ कि.मी.च्या उद्धरण नलिकेद्वारे शहरात आणण्याचे प्रकल्पीत आहे. लिंबोटी धरणाच्या बुडीत क्षेत्रात जौकवेल हाऊस आणि उद्धरण नलिका, पंपींग मशिनरी, भिमगड येथे उंच जलकुंभ, नवीन वाढ वस्तीत वितरण व्यवस्था अंथरणे आदी कामाचा त्यात समावेश आहे.योजना कार्यान्वित झाल्यानंतर शहराचा आगामी ५० वर्षाचा पिण्याचा पाणी प्रश्न योजनेमुळे दूर होणार असून १२ महिने मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सुरळीत पाणी पुरवठा होईल, असे नगराध्यक्षा शोभाताई नळगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सतत भेडसावणारी पाणी टंचाई आता या योजनेमुळे दूर होणार आहे. शोभाताई नळगे यांच्या कार्यकाळातील सर्वात मोठे व नागरिकांना कायमचा दिलासा देणारे काम असल्याची भावना नागरिकतून व्यक्त होत आहे. योजनेचे काम कमी काळात व जलद गतीने पूर्ण होण्याची प्रतिक्षा नागरिकातून होत आहे. (वार्ताहर)