शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

जल संवर्धनाचा लातूर पॅर्टन व्हावा

By admin | Updated: March 18, 2015 00:19 IST

लातूर : लातूर जिल्हा परिषदेने आपल्या कार्याच्या जोरावर यशवंत पंचायत राज अभियानात प्रथम क्रमांक मिळवून देशपातळीवरही नावलौकिक मिळवला आहे़

लातूर : लातूर जिल्हा परिषदेने आपल्या कार्याच्या जोरावर यशवंत पंचायत राज अभियानात प्रथम क्रमांक मिळवून देशपातळीवरही नावलौकिक मिळवला आहे़ असाच ‘लातूर पॅटर्न’ जल संवर्धनाचा निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांनी मंगळवारी येथे केले़ राष्ट्रीय ग्रामीण पेयजल व स्वच्छता जनजागृती सप्ताह निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजनाअंतर्गत ‘जल है तो कल है’ ही विशेष कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली होती़ यावेळी जि़प़ अध्यक्षा प्रतिभाताई पाटील मार्गदर्शन करीत होत्या़ यावेळी मंचावर समाजकल्याण सभापती वेणूताई गायकवाड, बांधकाम सभापती सपना घुगे पाटील, जि़प सदस्य राजेसाहेब सवाई , मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, प्रायमो पुणेचे सचिन हतागळे, विभागीय समन्वयक अरूण रसाळ, पाणी व सच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी शाम पटवारी यांची उपस्थिती होती़ प्रतिभा पाटील म्हणाल्या, जिल्ह्यात सर्वत्रच पाणीटंचाई जाणवत आहे़ या पाणीटंचाईला आपण सर्वजण जबाबदार आहेत़ जमिनीतून पाण्याचा बेसुमार उपसा होत आहे़ त्यामुळे दिवसेंदिवस भूजल पातळीत घट होत आहे़ पडलेला पाऊस, सांडलेले पाणी, नदी-नाल्याच्या माध्यमातून वाहून जात आहे़ ते जमिनीत मुरले जात नाही़ त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच जलसंवर्धनाचे महत्व ओळखून सर्व नागरिकांनी जलसंवर्धनात लातूर पॅटर्न निर्माण करण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)भविष्यात पाण्यासाठी युध्द होतील, असे एका विचारवंताने भविष्यवाणी केली होती़ ही भविष्यवाणी खरी ठरेल की काय, असे वाटत आहे़ देशात व राज्यात पाणीटंचाईच्या झळा नागरीक सोसताना दिसून येत आहेत़ या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी, सर्वांनी पडलेल्या पावसाचे पाणी व वापर करून टाकलेले पाणी तसेच वाहून जाणारे पाणी हे जमिनीत जिरवले पाहिजे़