शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

पाणी उपसा रोखला, २७० विद्युत कनेक्शन तोडले !

By admin | Updated: July 7, 2014 00:13 IST

लातूर : लातूर जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांत उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यातून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू केला आहे.

लातूर : लातूर जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांत उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यातून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू केला आहे. ३ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी आरक्षित करण्यासंदर्भात महसूल प्रशासन व पाटबंधारे विभागांना तातडीच्या सूचना देऊनही त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. या संदर्भात ‘लोकमत’ने ‘आरक्षित पाण्याचा उपसा सुरू’ या मथळ्याखाली रविवारी वृत्त प्रकाशित केले होते. तसेच विविध ठिकाणच्या प्रकल्पावर सुरू असलेल्या विद्युत मोटारी ‘स्टिंग आॅपरेशन’द्वारे प्रशासनास दाखवून दिले. या संदर्भात खडबडून जागे झालेल्या महसूल व महावितरणने रविवारी दिवसभरात २७० विद्युत मोटारींचे कनेक्शन तोडले आहेत.लातूर जिल्ह्यात यावर्षी जून लोटला तरी पाऊस पडला नसल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ज्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा शिल्लक आहे, अशा ठिकाणचे पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात यावे, अशी तातडीची सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन शर्मा यांनी ३ जुलै रोजी सर्व विभागांना दिली होती. तातडीच्या सूचना देऊनही महसूल प्रशासन व महावितरणने याकडे दुर्लक्ष केले होते. उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यातून शेतीसाठी दिवसेंदिवस मोठा उपसा होत असल्याने पाणीपातळी घटत होती. रविवारी औसा तालुक्यातील उटी (बु.) येथील तावरजा प्रकल्पावरील ७०, जळकोट तालुक्यातील ढोरसांगवी येथील प्रकल्पावरील १०० मोटारींचे विद्युत कनेक्शन महावितरणने तोडले आहेत. तसेच चाकूर तालुक्यातील बोथी प्रकल्पावर तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना एक दिवसाची मुदत दिली आहे. २५० मोटारींचा पुरवठा खंडित...जळकोट तालुक्यातील ढोरसांगवी प्रकल्पावर शेकडो मोटारींतून शेतकऱ्यांनी पाणी उपसा सुरू केला होता. दिवसेंदिवस पाणीसाठा घटत असल्याने प्रशासनाकडे नागरिकांनी तक्रार करूनही विद्युतपंपाचे कनेक्शन तोडण्यात आले नव्हते. मात्र ‘लोकमत’च्या वृत्ताने खडबडून जागे झालेल्या महसूल प्रशासनाने रविवारी ढोरसांगवी प्रकल्पावरील विद्युत मोटारींचे कनेक्शन तोडण्याच्या सूचना केल्यानंतर महावितरणच्या पथकाने २५० मोटारींचे कनेक्शन तोडले आहेत.जळकोट तालुक्यात २५० मोटारींचे वीज कनेक्शन तोडून ६० विद्युत मोटारी बाजूला काढण्यात आल्या आहेत.जप्तीचे आदेश...चाकूरचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी बोथी प्रकल्पावर सुरू असलेल्या मोटारी बंद करण्यासंदर्भात तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना रविवारी सूचना केल्या आहेत. मंडळ अधिकारी, तलाठी व बोथी येथील पोलिस पाटलाने प्रकल्पावरील मोटारींची पाहणी केली आहे. सोमवारी सर्व शेतकऱ्यांनी आपले विद्युतपंप काढून घ्यावेत, अशा सूचनाही तलाठ्याने दिल्या आहेत. त्यानंतरही प्रकल्पावर पंप आढळून आल्यास जप्त करण्यात येणार आहेत.६ जनित्रांचा पुरवठा खंडित...औसा तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्पावर असलेल्या सहा जनित्रांचा रविवारी सकाळी विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला. तहसीलदार दत्ता भारस्कर, नगरपालिका, सिंचन विभागाने कारवाई संदर्भात महावितरणकडे पत्र दिले होते. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच रविवारी सकाळपासूनच महसूल यंत्रणा कामाला लागली. तहसीलदारांनी बैठक घेऊन मंडळ अधिकारी व तलाठ्यांना सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी पाणीसाठा उपलब्ध आहे, अशा ठिकाणच्या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठीच व्हावा. शेतीसाठी होणारा वापर तात्काळ थांबवावा, असे आदेश तलाठ्यांना दिले आहेत. उपअभियंता एम.एन. घारोळे, कनिष्ठ अभियंता आर.एम. काळे म्हणाले, महावितरणच्या पथकाने कारवाई सुरू केली आहे. जवळपास ७० विद्युत मोटारींचे कनेक्शन तोडण्यात आले आहेत.