शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सावधान...कोणत्याही क्षणी पैठणच्या जायकवाडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग

By बापू सोळुंके | Updated: September 22, 2024 21:50 IST

मागील दोन महिन्यात जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्वभागातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला.

छत्रपती संभाजीनगर: पैठण येथील जायकवाडी प्रकल्प ९९.४५ टक्केपेक्षा अधिक भरला आहे. शिवाय पुढील काही दिवस पावसाचे असल्याने जायकवाडी प्रकल्पातून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात कडा प्रशासनाने घेतला. यापार्श्वभूमीवर गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा रविवारी रात्री दिला आहे. 

 मागील दोन महिन्यात जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्वभागातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील लहान, मोठी धरणे पाण्याने तुडुंब भरली आहे. या दोन्ही जिल्ह्यात आता पावसाचे नवीन थेंब साठविणे शक्य होणार नाही, अशी परिस्थिती आहे. यामुळे उर्ध्वभागात पाऊस होताच सर्व पाणी गोदापात्राद्वारे जायकवाडी प्रकल्पात येणार आहे. आज जायकवाडी प्रकल्पात ९९.५० टक्के जलसाठा झाला आहे. यामुळे प्रकल्पाच्या सांडव्यातून गोदापात्रात पाणी सोडण्याचा निर्णय कडा प्रशासनाने घेतला. गोदावरी नदी काठच्या गावातील रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.यापूर्वी १२ दिवस उघडले होते जायकवाडीचे दरवाजेयापूर्वी पंधरा ते वीस दिवसापूर्वी जायकवाडी प्रकल्पाचे टप्प्या,टप्प्याने १२ दरवाजे उघडले होते. तेव्हा ९ हजार ८०० क्युसेक क्षमतेने गोदापात्रात पाणी सोडण्यात आले होते. नंतर टप्प्या,टप्याने धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले होते. आता पुन्हा पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे.

जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व भागातील गंगापुर,वैजापुर तालुक्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. शिवाय रिमझिम पाऊसही पडत आहे. प्रकल्प शंभर टक्के भरत आल्याने प्रकल्पातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग करण्याची आवश्यकता पडू शकते. ही बाब लक्षात घेऊन गोदाकाठच्या गावांत कोणतीही हाणी होऊ नये, यासाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. ---समाधान सब्बीनवार. प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरण