शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याची समस्या कायम

By admin | Updated: May 6, 2017 00:15 IST

उस्मानाबाद : केंद्राने केलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत उस्मानाबादने २१९ वा क्रमांक पटकाविला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : केंद्राने केलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत उस्मानाबादने २१९ वा क्रमांक पटकाविला आहे. पालिकेच्या या यशाबद्दल कौतुक होत असले तरी शहरातील अनेक भागात आजही कचऱ्याचे ढिगारे जैसे थे असल्याने पुर्नार्थाने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनीही पुढाकार घेण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. देशातील स्वच्छ शहरांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. या यादीत २१९ वा क्रमांक पटकावित मराठवाड्यात नांदेडनंतर उस्मानाबादने बाजी मारली आहे. या यादीत मराठवाड्यातील परभणी शहर २२९ व्या, उदगीर २४०, औरंगाबाद २९९, बीड ३०२, लातूर ३१८ तर जालना शहराचा क्रमांक १६८ असा आहे. मराठवाड्यातील इतर शहरांच्या तुलनेत उस्मानाबादने घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. मात्र स्वच्छ शहराचा मिळालेला लौकीक कायम ठेवण्यासाठी आणखी परिश्रमाची आवश्यकता असल्याचेच शहराच्या विविध भागातील परिस्थिती सांगते.शहरातील मध्यवर्ती असलेल्या समता नगर, आनंदनगर तसेच रामनगरमधीलही प्रमुख रस्त्याच्या कडेला अनेक नागरिक कचरा टाकत असल्याचे दिसून येते. या भागातील कचराकुंड्या पालिकेने काही दिवसापूर्वी काढून टाकल्या आहेत. कचराकुंड्याबरोबरच शेजारी नागरिक कचरा टाकत होते. त्यामुळेच कुंड्या काढल्यास घरातील कचरा नागरिक घरात साठवून घंटागाडीमध्ये देतील ही अपेक्षा होती. मात्र त्यानंतरही कचरा रस्त्यावर फेकला जात आहे. अशीच परिस्थिती जिल्हा स्टेडियम ते पालिका कार्यालय या मार्गावर असल्याचे दिसते. या परिसरातील अनेक व्यापारी रस्त्याच्या बाजूला कचरा फेकतात. विशेष म्हणजे नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराशेजारीही कचऱ्याचे ढीग दिसून येतात. गणेशनगर, खाजानगर या परिसरातील स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता दिसून आली.