शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही वर्षातील तारखेचा सांगतो वार

By admin | Updated: July 9, 2017 00:42 IST

चित्तेपिंपळगाव :तब्बल १० वर्षांची दिनदर्शिका ही वार, तारखेनिहाय, लहान-सहान तिथींसह मुखोद्गत सांगणाऱ्या लायगावच्या १६ वर्षीय अंध विद्यार्थ्याची स्मरणशक्ती थक्क करणारी आहे.

भाऊसाहेब शेजूळ । लोकमत न्यूज नेटवर्कचित्तेपिंपळगाव : वर्षभरातील महापुरुषांची जयंती, सण, उत्सवाच्या तिथी आणि तारखांनुसार वार सांगणे भल्याभल्या विद्वानांनाही शक्य नाही; पण तब्बल १० वर्षांची दिनदर्शिका ही वार, तारखेनिहाय, लहान-सहान तिथींसह मुखोद्गत सांगणाऱ्या लायगावच्या १६ वर्षीय अंध विद्यार्थ्याची स्मरणशक्ती थक्क करणारी आहे. काकासाहेब बोंगाणे असे अंध विद्यार्थ्याचे नाव आहे. तो दगडू बोंगाणे यांचा मुलगा. त्यांना दोन मुली व दोन मुले आहेत. त्यापैकी काकासाहेब तिसऱ्या नंबरचा. जन्मजात अंध. या कुटुंबाकडे उपजीविकेसाठी वडिलोपार्जित सव्वा एकर शेती आहे. त्यामुळे परिस्थिती बेताचीच; परंतु मेहनत, मोलमजुरीने दगडू बोंगाणे कुटुंबाचा गाडा ओढतात. काकासाहेबच्या अचाट स्मरणशक्तीचा प्रत्यय तो दोन वर्षांचा असतानाच येऊ लागला. दोन वर्षांचा चिमुकला बहुतांश गोष्टी स्मरणात ठेवू लागला. तो शाळेत जाण्याचा आग्रह धरू लागला. काकासाहेबला २००६ मध्ये एका अंध विद्यालयात प्रवेश देण्यात आला. आज तो इयत्ता आठवीत आहे. वाढत्या वयासोबतच त्याची स्मरणशक्तीही वेगाने विकसित होत होती. सध्या तर तो २०१० ते २०२० या कालावधीतील कॅलेंडरवरील तारीख व वार तिथीसह तोंडपाठ सांगतो. गतवर्षीचे कॅलेंडर असो की आगामी वर्षाचे. तुम्ही मोबाइलवर कॅलेंडर उघडून त्याची परीक्षा घेऊ शकता. आलटून पालटून प्रश्न विचारले तरीही न अडखळता तो उत्तर देतो. पुढे शिक्षण निरंतर चालू ठेवून अपंगत्वावर मात करून कुटुंबाला व भावंडाला मदत करण्याची इच्छा काकासाहेब बोलून दाखवितो.