औरंगाबाद : मराठवाडा ऍक्सिलरेटर फॉर ग्रोथ अँड इनक्युबेशन कौन्सिल (मॅजिक) तर्फे इनोव्हेटिव्ह ‘स्टार्ट अप’ना पाच लाखांची बक्षिसे दिली जाणर आहेत. नवउद्योजकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य उपक्रमांमध्ये रुपांतरीत करण्यासासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून ‘इनोव्हेट फॉर इंडिया चॅलेंज 2022’ घेण्यात येत आहे. या स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. प्रोटोटाईप आणि महसूल अशा टप्प्यांवरील स्टार्टअप्सकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. संकल्पना स्तरावरील स्टार्टअप्स हे प्रोटोटाइप श्रेणी अंतर्गत अर्ज सादर करू शकतात.
या स्पर्धेसाठी bit.ly/IFIC2022 या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येईल. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 5 मार्च असून अधिक माहितीसाठी contact@magicaurangabad.com वर संपर्क साधता येईल, अशी माहिती मॅजिकचे संस्थापक संचालक आशिष गर्दे यांनी दिली. मॅजिक हे एमएसएमई मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीद्वारे मान्यताप्राप्त बिझनेस इनक्यूबेट संस्था आहे. मॅजिक संस्था स्टार्टअप आणि ऍक्सिलरेटर सेवांची श्रेणी प्रदान करते. ज्यात कल्पना, व्यवसाय योजना मूल्यमापन, प्रोटोटाइप डिझाइनिंग, को-वर्किंग स्पेस, व्यवसाय सल्लागार, निधी संकलन, पेटंटिंग, कॉपीराइट आणि ट्रेडमार्किंग आणि जलद विकासवृद्धी मार्गदर्शन यांचा समाविष्ट आहे.
गतवर्षी देशभरातून २५०अर्जगतवर्षी देशातील 17 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधून 350 अर्ज प्राप्त झाले होते. मूल्यमापनाच्या अनेक फेऱ्यांनंतर, 4 लाख रुपयांच्या एकत्रित बक्षिसांसह सहा विजेत्यांची घोषणा करण्यात आली होती, अशी माहिती आशिष गर्दे यांनी दिली.
एक हजार नवउद्योजकांना बळमॅजिकची स्थापना सीएमआयएच्या सदस्यांनी केली आहे. मॅजिक संस्था स्टार्टअप आणि ऍक्सिलरेटर सेवांची श्रेणी प्रदान करते. आतापर्यंत संस्थेने हजाराहून अधिक नवउद्योजकांना मार्गदर्शन केले असून, औपचारिकपणे 34 स्टार्टअप्सना इंक्युबेट केले आहे.