शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

औरंगाबादमधील सभेपासूनच राज्यभर ‘वंचित’ची हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 16:50 IST

त्यानंतर राज्यभर झालेल्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देओवेसी चार दिवस ठाण मांडून बसलेजबिंदा लॉन्सवरील जाहीर सभेचा प्रभाव

औरंगाबाद : औरंगाबाद ही खरं तर कार्यशाळाच होय. इथे केलेले प्रयोग यशस्वी होतात आणि नंतर ते महाराष्ट्रभर पसरतात. तसंच काहीसं एमआयएमचं व नंतर वंचित बहुजन आघाडीचं झालं. २०१४ साली प्रथमत:च एमआयएमने इथे विधानसभा निवडणुकीत उडी घेतली आणि औरंगाबाद मध्यमधून इम्तियाज जलील हे आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीतही एमआयएमचे २५ नगरसेवक आले. 

२ आॅक्टोबर २०१८ रोजी औरंगाबादच्या जबिंदा लॉन्सवर वंचित बहुजन आघाडीची पहिली जाहीर सभा झाली. अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर व असदुद्दीन ओवेसी यांची ही मोठी सभा होती. या सभेपासूनच महाराष्ट्रभर ‘वंचित’ची हवा निर्माण होऊ लागली. आमदार इम्तियाज जलील यांची औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून घोषणा झाली आणि मुस्लिम व दलित समाजाचं झपाट्यानं धु्रवीकरण झालं. हे दोन्ही समाज एक झाले. 

असदोद्दीन ओवेसी यांनी दिले चार दिवसजलील यांचा प्रचार करण्यासाठी स्वत: असदोद्दीन ओवेसी हे औरंगाबाद मतदारसंघात तळ ठोकून होते. शहरात त्यांनी छोट्या- मोठ्या सभा घ्यायला सुरुवात केली. अनेक  मोहल्ल्यांमध्ये त्यांनी पदयात्रा केल्या. प्रतिसाद मिळत गेला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात त्यांनी शहरातील बुद्धिमंत व जाणकार कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

जबिंदा लॉन्सवरील बाळासाहेब आंबेडकरांची सभाप्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ज्या जबिंदा लॉन्सवर वंचित बहुजन आघाडीने निवडणुका लढण्याचा आणि जिंकण्याचा संकल्प केला होता, त्याच लॉन्सवर अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर व असदोद्दीन ओवेसी यांची संयुक्त जाहीर सभा झाली. त्याच दिवशी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होती. परंतु त्या सभेला मिळालेला प्रतिसाद आणि वंचित बहुजन आघाडीच्या या सभेची तुलना केली असता, ‘वंचित’ची सभा किती तरी मोठी राहिली.

एकतर्फी मतदान...बाळासाहेब आणि असदोद्दीन ओवेसी यांच्यामुळे दलित आणि मुस्लिम समाज खूपच एकवटला गेला आणि एकतर्फी मतदान ज्याला म्हणतात, ती जलील यांना झाली आणि त्याचा परिणाम ते विजयी झाले. वंचित हा एक प्रयोग आहे. त्यात केवळ दलित आणि मुस्लिम हे दोनच समाज अपेक्षित नाहीत. तर ओबीसी, सूक्ष्म ओबीसी, भटके  विमुक्त, ज्यांच्यापर्यंत लोकशाहीची किरणे पोहोचलीच नाहीत, त्यांना या मूळ प्रवाहात आणण्याचा हा संघर्ष होता.

दिग्गज नेत्यांच्या सभेमुळे हवाऔरंगाबादच्या जबिंदा लॉन्सवर वंचित बहुजन आघाडीची पहिली जाहीर सभा २ आॅक्टोबर २०१८ रोजी झाली. अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर व असदोद्दीन ओवेसी यांची ही मोठी सभा होती. या सभेपासूनच महाराष्ट्रभर ‘वंचित’ची हवा निर्माण होऊ लागली. त्यानंतर राज्यभर झालेल्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल