शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज सिंगल बातम्या फाइल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 10:10 IST

वाळूज महानगर : २२ वर्षीय तरुणाला धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या फरार रिक्षा चालकाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात ...

वाळूज महानगर : २२ वर्षीय तरुणाला धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या फरार रिक्षा चालकाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश शंकर गायकवाड (रा. पंढरपूर) ७ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता कंपनीतून सुटी झाल्यानंतर पायी घरी जात होता. पंढरपुरातील बुलेट शोरूमसमोर भरधाव रिक्षाने (एम.एच.२०, सी.यू.०१९२) त्याला पाठीमागून जोराची धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान रात्री ११.४५ वाजता गणेश गायकवाड याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी शंकर गायकवाड यांच्या फिर्यादीवरून फरार रिक्षा चालकाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-----------------------

मार्शल आर्टच्या खेळाडूंना प्रमाणपत्राचे वाटप

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगर परिसरातील श्री नारायण मार्शल आर्टतर्फे प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंना बेल्ट व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

वोवीनाम राज्य असोसिएशनतर्फे वाळूज महानगर परिसरातील खेळाडूंना स्वरक्षणासाठी मार्शल आर्टचे प्रशिक्षण देण्यात येते. सिडको महानगरात आयोजित कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष शंकर महाबळे यांच्या हस्ते मार्शल आर्टचे यशस्वी प्रशिक्षण घेणाऱ्या ५३ खेळाडूंना बेल्ट व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या खेळाडूंना प्रशिक्षक भाग्यश्री महाबळे, नेहा चौघुले यांचे मार्गदर्शन लाभले.

----------------------------

सुनील राठी यांची निवड

वाळूज महानगर : सुनील राठी यांची भाजप युवा मोर्चाच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सूरज लोळगे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.

---------------------------

एफडीसी चौकात अतिक्रमण

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील एफडीसी चौकात विविध विक्रेत्यांनी अतिक्रमणे करून व्यवसाय थाटले आहेत. या अतिक्रमणांमुळे या चौकात सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. विक्रेत्यांनी रस्त्याच्या कडेला हॉटेल, हातगाड्या व पानटपऱ्या टाकून व्यवसाय सुरू केले. ग्राहकही रस्त्यावर वाहने उभी करीत असल्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. अतिक्रमणे हटविण्याची मागणी सुशील सूर्यवंशी, राजेभाऊ शिंदे, आदित्य मुळे आदींनी केली आहे.

-------------------------------

वाळूजला पथदिवे बंदच

वाळूज महानगर : वाळूज ते कमळापूर रस्त्यावरील पथदिवे बंद असल्यामुळे नागरिक व वाहनधारकांना अंधारातून ये-जा करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने लावलेले अनेक पथदिवे व क्लस्टरमधून उभारण्यात आलेले हायमास्टही बंदच असल्यामुळे सर्वत्र अंधार असतो. या पथदिव्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

-------------------------